उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; जाणून घ्या निवडणूक प्रक्रिया

182 0

नवी दिल्ली: भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला पूर्ण होत असून आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड व विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गरेट अल्वा यांच्यात लढत होणार आहे. मतदान प्रक्रिया सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत संसद भवनात पार पडणार आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान कसे होते?

घटनेच्या अनुच्छेद 66 मध्ये उपराष्ट्रपती निवडीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. ही निवडणूक आनुपातिक प्रातिनिधिक पद्धतीने केली जाते. एकल हस्तांतरणीय मतदान प्रणालीद्वारे मतदान केले जाते. सोप्या शब्दात सांगायचे तर या निवडणुकीतील मतदाराला पसंतीक्रमाच्या आधारे मतदान करायचे आहे. उदाहरणार्थ, मतपत्रिकेवर उपस्थित असलेल्या उमेदवारांमध्ये, तो इतर उमेदवारांसमोर त्याची पहिली पसंती एक, दुसरी पसंती दोन असे लिहितो. ही संपूर्ण प्रक्रिया गुप्त मतदान पद्धतीने केली जाते. मतदाराला आपली पसंती रोमन अंकांच्या स्वरूपात लिहायची आहे. हे लिहिण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या विशेष पेनचाही वापर करावा लागेल. या निवडणुकीत दोनच उमेदवार असल्याने विजयासाठी आवश्यक असलेली मते मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एकाच उमेदवाराला जाणार आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावी लागणार नाही.

उपराष्ट्रपतींच्या जबाबदाऱ्या

उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती असतात. राज्यघटनेत हीच त्यांची सगळ्यात मोठी जबाबदारी असते.

राष्ट्रपतीपद काही कारणाने रिक्त झालं तर त्यांना राष्ट्रपतिपदाच्या जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. कारण राष्ट्रपतिपद रिक्त राहू शकत नाही.

पदांचा क्रम पाहिल्यास उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतिंपेक्षा कनिष्ठ आणि पंतप्रधानांपेक्षा वरिष्ठ असतात. शेजारी देशांशी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने ते परराष्ट्र दौरेही करतात.

Share This News

Related Post

eknath shinde

राज्य सरकारचा मोठा निर्णय! महिला आणि बालकांसाठी नवी हेल्पलाईन सुरु करणार

Posted by - May 4, 2023 0
मुंबई : राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महिला आणि बालकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील संकटग्रस्त महिला…

व्यक्तिविशेष : भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा आज जन्मदिवस; ‘भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा’ चा दिला होता नारा !

Posted by - December 27, 2022 0
पंजाबराव देशमुख (जन्म : पापळ-अमरावती जिल्हा, २७ डिसेंबर १८९८; – दिल्ली, १० एप्रिल १९६५) यांचा जन्म पापळ या गावी झाला.…
Mahayuti Seat Sharing

Mahayuti Seat Sharing : ‘या’ 4 जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली; अजूनही तोडगा निघेना

Posted by - March 23, 2024 0
मुंबई : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक (Mahayuti Seat Sharing) आयोगाकडून अधिसूचना जारी होऊनही राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा…
Weather Update

Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! पुढील 2 दिवस अती महत्त्वाचे; IMD कडून नवा हायअलर्ट जारी

Posted by - June 2, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा (Weather Update) फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे फळबागा आणि पिकांचं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *