Mantralaya

Cursed Hall : मंत्रालयातील ‘602’ नंबरचं दालन ‘शापित’ म्हणून ओळखले जाते काय आहे त्यामागचा इतिहास ?

1503 0

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना अखेर 6 व्या मजल्यावरील अतिरिक्त प्रधान सचिवांचे दालन (Cursed Hall) देण्यात आले आहे. मंत्रलयाच्या 6 व्या मजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही दालन (Cursed Hall) आहे. पण याच मजल्यावरील शापित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 602 दालनात (Cursed Hall) कोणीही जाण्यास तयार नसल्याची माहिती आहे. या दालनाला शापित दालन असं का म्हंटल जातं पाहुयात…

Pune NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची निवड

सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाच्या मंत्र्याला हे दालन दिलं जातं. पण हे दालन आजपर्यंत अनेक मंत्र्यांना अडचणीत आणणारे ठरले आहे. 1999 साली कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. तेव्हा छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना 602 हे दालन देण्यात आलं होतं. पण कालांतराने त्यांच्यावर तेलगी घोटाळ्याचा आरोप झाला होता.त्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडाव लागल. 2014 मध्ये आघाडी सरकारला खाली खेचून भाजप सरकार सत्तेत आलं. त्यावेळी 602 दालन हे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मिळालं. एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल विभागासह अनेक खात्यांचा पदभार होता. परंतु, एमआयडीसी जमीन घोटाळ्यासह इतर आरोप झाले. त्यामुळे खडसे यांना पायउतार व्हावं लागलं होतं. खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर 602 दालन हे भाजपचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांना देण्यात आलं होतं. फुंडकर हे तत्कालीन कृषी मंत्री होते. फुंडकर हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गटातील नेते होते. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळातला सहभाग हा फारच कमी दिसला. कित्येक वेळा कृषी विभागाबद्दल माजी सहकार मंत्री सुभाष देशमुखच घोषणा करत होते. दुर्दैवाने फुंडकर यांचं ह्रदयविकाराच्या धक्काने निधन झालं. त्यांच्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्याआधी 602 दालन हे अनिल बोंडे यांना देण्यात आलं होतं. पण, विधानसभा निवडणुकीत अनिल बोंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Shantirani Chakraborty Passed Away : मिथुन चक्रवर्ती यांच्या मातोश्री शांतिरानी चक्रवर्ती यांचं निधन

गंमत म्हणजे, 602 दालन हे मंत्रालयातील सर्वात मोठे दालन आहे. त्यामुळे या दालनात फडणवीस यांच्या काळात तीन विभाग करण्यात आले होते. यात अर्जुन खोतकर आणि सदाभाऊ खोत यांची दालनंही थाटण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर पराभूत झाले आणि फडणवीस सरकार नसल्यामुळे खोत यांनाही हे दालन सोडाव लागल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून 602 हे दालन देण्यात आलं होतं. पण शापित दालन अशी ओळख असल्याने त्यांनी हे दालन बदलून घेतलं. आतापर्यंतच्या इतिहासामुळे 602 दालन हे ज्या मंत्र्यांना मिळाल त्यांच्या पदरी आरोप आणि अपयशच पदरी पडले आहेत. त्यामुळे हे दालन घेण्यासाठी कोणत्याही सरकार मधील मंत्री तयार होत नाहीत.

Share This News

Related Post

Love Story

Love Story : एक सीमा अशीही! पब्जीमुळे पाकिस्तानी सीमा आणि नोएडाचा सचिन यांची अनोखी प्रेमकहाणी

Posted by - July 14, 2023 0
पाकिस्तानी सीमा आणि नोएडात राहणारा सचिन यांची प्रेमकहाणीची (Love Story) चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे. भारतासह पाकिस्तानातही सीमा हैदर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात, आमदार जगताप सुखरूप

Posted by - May 17, 2022 0
अहमदनगर – नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आज पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. जगताप…

सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळून गिर्यारोहकाचा मृत्यू

Posted by - June 26, 2022 0
किल्ले सिंहगडावर अचानक कोसळलेल्या दरडीत अडकून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हेमांग गाला असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी…
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची ‘महापत्रकार परिषद’

Posted by - January 16, 2024 0
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Uddhav Thackeray) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *