chandrayan 3

Chandrayaan-3 : ठरलं ! 14 जुलैला होणार चांद्रयान -3 चं प्रक्षेपण

1087 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने बहुप्रतिक्षित चंद्रयान-3 (Chandrayaan-3) या मोहिमेच्या प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली आहे. चंद्रयान-3 चे (Chandrayaan-3) प्रक्षेपण 14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता होणार आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून यानाच्या प्रक्षेपणासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ही मोहिम यशस्वी ठरली तर भारताचा जगभरात डंका होणार आहे. या मोहिमेत यशस्वी होणारा भारत देश हा जगातला चौथा देश ठरणार आहे.

चांद्रयान मोहिमेअंतर्गत इस्रोला चंद्राचा अभ्यास करायचा आहे. भारताने 2008 मध्ये पहिल्यांदा चांद्रयान-1 चे यशस्वी प्रक्षेपण केले होते. यानंतर 2019 मध्ये चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणात भारताला अपयश आले. आता भारत चांद्रयान-3 लाँच करून इतिहास रचण्याचा प्रयत्न करत आहे. इस्त्रोचे शास्त्रज्ञ गेल्या काही दिवसांपासून चांद्रयान-3 मोहिमेसाठी दिवसरात्र काम करत आहेत. ही मोहिम इस्त्रो आणि भारत सरकारसाठी अतिशय महत्त्वकांक्षी अशी मोहीम आहे. ही मोहिम यशस्वी झाली तर शास्त्रज्ञांना चंद्र ग्रहावरील अनेक गोष्टींची माहिती मिळणार आहे. ही मोहीम यशस्वी ठरली तर चंद्राविषयीचे अनेक गूढ उलगडण्यास मदत होणार आहे. इस्त्रोच्या चांद्रयान-2 चं चंद्रावर लँडिंग झाल्यानंतर अंतिम क्षणाला संपर्क तुटला होता. त्यामुळे खगोल शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशाच्या नागरिकांचा मोठा हिरमोड झाला होता. या नव्या चांद्रयान-3 मोहिमेवर सरकारसह शास्त्रज्ञांना खूप आशा आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन या यानचं लॉन्चिंग केलं जाणार आहे. 14 जुलैला दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चंद्रयान-3 चं प्रक्षेपण होणार आहे. चांद्रयान – 3 चं वैशिष्ट्य काय आहे पाहुयात…

चांद्रयान-3 तयारी झाली ! काय आहेत वैशिष्ट्ये?

1) इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी या विषयी माहिती दिली आहे. चांद्रयान-3 हे यान 23 आणि 24 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर किंवा परिघात लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल.

2) चांद्रयान-3 हे रॉकेटच्या वरच्या भागात ठेवण्यात आलं आहे. यानंतर ते असेम्लिंग युनीटमध्ये नेण्यात आलं आहे. जीएसएलवी एमके-3 या रॉकेटशी ते संलग्न करण्यात आलं आहे.

3) चांद्रयान-3 या मोहिमेचं बजेट तब्बल 651 कोटी रुपये इतक आहे.

4) चांद्रयान-3 चं लँडर (Chandrayaan-3) चंद्रावर लँडिंग होण्यास यशस्वी झालं तर अशी मोहिम करणारा भारत हा जगातील चौथा देश असणार आहे. याआधी अमेरिका, रशिया, चीन या देशांनी चंद्रावर आपले स्पेसक्राफ्ट उतरवले आहेत.

5) या मोहिमेअंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावर एक लँडर उतरवण्यात येणार. या लँडरला एक रोवर आहे. ही रोवर चंद्राच्या जमिनीवर फिरेल आणि तिथे काही प्रयोग करणार आहे.

Cabinet Expansion : अखेर मुहूर्त मिळाला ! ‘या’ दिवशी पार पडणार मंत्रिमंडळाचा विस्तार

6) हे लँडर चंद्रावर एक लूनार दिवसपर्यंत राहील. एक लूनार दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 14 दिवस.

7) चांद्रयान-3 च्या लँडरसाठी चंद्रावर सूर्यप्रकाश असणं जरुरीच आहे. चंद्रावर 14-15 दिवस सूर्य उगवतो. तर पुढचे 14-15 दिवस सूर्य उगवत नाही.

इस्त्रोच्या वैज्ञानिकांकडून या मोहिमेसाठी खूप मेहनत आणि प्रयत्नदेखील करण्यात येत आहेत. भारतीय या नव्या चांद्रयानाचं प्रक्षेपण पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. तसेच हे चांद्रयान जेव्हा चंद्रावर लँड होईल, तेव्हाचा रोमांचक क्षण भारतीयांना आपल्या डोळ्यांत साठवायचा आहे.

Share This News

Related Post

LokSabha

TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट : ‘या’ आहेत देशातील ‘टॉप 10 हाय वोल्टेज’ लढती; दिग्गज नेत्यांपुढे विजयाचं आव्हान

Posted by - March 29, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्यापासून महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच लढतींचा आढावा आपण घेतलेला आहे. मात्र आज आपण देशातल्या टॉप टेन…

मंगेशकर कुटुंबाचं देशासाठी मोठं योगदान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लतादीदींच्या आठवणींना उजाळा

Posted by - April 24, 2022 0
गानसाम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा स्वर म्हणजे युवापिढीसाठी प्रेरणा असून देशाच्या जडणघडणीमध्ये मंगेशकर कुटुंबाचं देशासाठी मोठं योगदान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र…
Cough Syrup

Cough Syrup : खोकल्याचं औषधं ठरत आहे मृत्यूचे कारण ! 7 भारतीय कफ सिरप कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये

Posted by - June 21, 2023 0
खोकला झाला की आपण कफ सिरप (Cough Syrup) घेतो मात्र हेच कफ सिरप तुमच्या मृत्यूचं कारण ठरू शकतं. आफ्रिकन देश…

ही आहेत भारतामधील बंजी जंपचा आनंद देणारी पाच ठिकाणे

Posted by - May 18, 2022 0
मुंबई – काहींना शांत ठिकाणी सुट्टीचा आनंद लुटायला आवडतो, तर काहींना साहसी खेळांमध्ये भाग घ्यायला आवडतो. अलीकडे, बंजी जंपिंग प्रत्येकाच्या…
Sehar-Shinwari

WC 2023: भारताला हरवलं तर मी तुमच्यासोबत…; पाकिस्तानी अभिनेत्रीची बांगलादेशी खेळाडूंना खुली ऑफर

Posted by - October 18, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकदिवसीय विश्वचषकाच्या (WC 2023) बाराव्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानचा झालेला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *