कार्डलेस कॅश विड्रॉल सुविधा म्हणजे काय ? जाणून घ्या महत्वाची माहिती

104 0

भारतात बँकिंग क्षेत्रात वेगानं डिजिटलायझेशन झाल्याचं पाहायला मिळतंय. पहिल्यांदा आपल्याला पैसे काढण्यासाठी बँकेत जावं लागत होतं, नंतर एटीएम कार्डच्या रांगेत उभं राहून पैसे काढू लागलो. त्यासाठी डेबिट/रुपे कार्डचा वापर केला जाऊ लागला. पण आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी कोणत्याही कार्डची गरज भासणार नाही. कारण देशात आता कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. त्यामुळं कार्डलेस कॅश विड्रॉल सुविधा म्हणजे काय जाणून घेऊयात…

यूपीआयचा वापर करत एटीएममधून बिना कार्डचे पैसे काढता येण्याच्या सुविधेचा विस्तार करण्यात येणार आहे. ही सुविधा देशातील सर्व बँकांसाठी लागू होणार आहे. सरकारी बँक असो वा खासगी, प्रत्येक बँकेचा ग्राहक ही सुविधा वापरु शकेल. दरम्यान, देशाला कॅशलेस बनवण्यासाठी आरबीआयकडून आवश्यक पाऊले उचलण्यात येणार आहे. पेमेंट सिस्टीममध्ये सुधारणा करुन जास्तीत जास्त लोकांना सुरक्षित, सुलभता आणि क्षमतेएवढे पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा येणार असल्याचं शक्तीकांत दास म्हणालेत.

सुरुवातीला कोणत्या बँकांना सुविधा दिल्या जाणार ?

सुरुवातीला भारतीय स्टेट बँक (SBI), बँक ऑफ बडोदा (BoB) या बँकांमधील ग्राहकांना डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्डचा वापर न करता सुविधा देण्यात आली. आता ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, आणि RBL बँक या बँकांमधील ग्राहकांना देखील ही सुविधा दिली जाणार आहे. ही सुविधा दैनंदिन व्यवहाराची मर्यादा दहा हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत असणार आहे.

कार्डशिवाय कसे काढाल पैसे ?

त्यासाठी एसबीआय बँकेचं उदाहरण पाहूयात… एसबीआय खातेधारकांना योनो अ‍ॅपमध्ये लॉग इन करावे लागते. त्यानंतर योनो कॅशवर क्लिक करावे. त्यानंतर एटीएम सेक्शनमध्ये जा… एटीएममधून जितकी रक्कम काढायची ती नोंदवा.. त्यानंतर एसबीआयकडून तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर एक क्रमांक पाठवेल. एसबीआयच्या एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढण्यासाठी त्या क्रमांकाचा आणि पिन क्रमांकाचा वापर करा. एसबीआय एटीएममध्ये पहिल्यांदा पेज कार्ड हा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर योनो कॅश हा पर्याय निवडल्यानंतर सर्व माहिती भरावी लागते…

ग्राहकांना काय फायदा होणार?

ग्राहकांना जर एटीएम कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास, फसवणुकीला आळा बसेल, एटीएम क्लोनिंग, एटीएम स्किमिंग सारखे प्रकार घडणार नाहीत. ग्राहकांची गैर सोय दूर होईल. जर एखादा ग्राहक आपले कार्ड घरी विसरला किंवा त्याच्याकडून एटीएम हरवले तरी देखील त्याला पैसे काढता येतील. म्हणजेच काय तर पैशाअभावी त्याची गैरसोय होणार नाही. कार्डलेस सुविधा म्हणजे अशी सुविधा की ज्यामध्ये ग्राहकाला बँकेच्या एटीएममधून पैसे काढताना आपले कार्ड वापरण्याची गरज राहणार नाही. तो कार्ड नसताना देखील पैसे काढू शकतो. ही सुविधा युपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसवर आधारित असणार आहे.

Share This News

Related Post

Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी आज काळा दिवस; गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका

Posted by - December 23, 2022 0
Stock Market : या आठवड्यातील व्यवहाराचा शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला. आज सकाळपासून सुरू झालेली घसरण कायम…

ATM FRAUD ! एटीएम वापरताना काय काळजी घ्यावी ? फसवणुकीपासून व्हा सावध

Posted by - December 7, 2022 0
ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. फोन पे गुगल पेसह एटीएम फसवणुकीच्या घटना देखील रोज घडतात. त्यामुळं एटीएम वापरताना…
UPI Lite

UPI Lite : आनंदाची बातमी ! आता GPay वरून PIN न टाकता झटपट करता येईल पेमेंट

Posted by - July 14, 2023 0
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने UPI Lite ही सर्व्हिस लॉन्च केली होती. हि डिजिटल पेमेंट सर्व्हिस नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ…

फेक कॉल करणाऱ्यांनो सावधान ! आता तुमचे नाव लपून राहणार नाही !

Posted by - May 21, 2022 0
नवी दिल्ली- जेंव्हा अननोन नंबरवरून कॉल आला की तुमच्या स्क्रीनवर फक्त त्याचा नंबर दिसतो. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांचे चांगलेच फावते.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *