जिमला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी कटाक्षानं टाळा

209 0

 

आजकाल तरुण पिढी तसेच बाकी ही लोकांचे बॉडी, फिगर या गोष्टींकडे खुप लक्ष असते. चांगले दिसण्यासाठी आणि स्वतःला फिट ठेवण्यासाठी वेगवेगले डाएट घेतले जाते तसेच खुप लोकं जिमही करताना दिसतात.

दररोज जिम केल्याने शरीराचा व्यायाम तर होतोच पण बॉडीदेखील बनते. पण बॉडी बनवण्याचा विचाराने आपण आपल्या खाणं पिणं या गोष्टींकडे नजरअंदाज करतो. याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो त्यामुळे जिमला जाण्यापूर्वी खालील काही गोष्टी आहेत त्या टाळल्या पाहिजे.

जिमला जाताना उपाशीपोटी जाऊ नका

बरीच लोकं जिम ला जाताना उपाशीपोटी जातात. काही खाऊन गेलं तर जिम करायला त्रास होईल असे वाटते. पण काहीच न खाता जर जिम ला गेलो तर तुम्हाला खूप थकवा येतो आणि त्याच बरोबर जिम करताना चक्करसुद्धा येऊ शकते.त्यामुळे जिमला उपाशीपोटी जाणं टाळलं पाहिजे. जिमपूर्वी अर्धा – पाऊण तास अगोदर तुम्ही हलका आहार घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला जिम करताना थकवा येणार नाही.

जिमला जाण्यापूर्वी लगेच जास्त पाणी पिऊ नका

जिम करत असताना पाणी प्यायला पाहिजे. जिमला जाण्यापूर्वी जर जास्त पाणी पिऊन गेलं तर चालताना किंवा अजून काही शारीरिक हालचाल करताना त्रास होऊ शकतो तसेच आपल्याला सुस्ती आल्यासारखे वाटते. त्यामुळे जिम करत असताना एनर्जी खर्च होत असते त्यामुळे जिम करतेवेळी थोडं थोडं पाणी काही अंतराने पिट राहावे.

जिमला जाण्यापूर्वी कॉफी पिणं टाळा

कॉफी पिल्याने ऊर्जा मिळते पण जिम ला जाण्यापूर्वी कॉफीचे सेवन केलं ऊर्जा मिळते पण तितक्याच लवकर ऊर्जा नष्टही होते आणि त्यामुळे जिम करते वेळेस थकवा येऊ शकतो. तसेच काही लोकं पोटाची चरबी कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी चं सेवन करतात परिनामी शरीराला सवय लागून जाते व भूक लागनेही कमी होते.

प्रोटीनयुक्त पदार्थांचं सेवन जिमनंतरच केलं पाहिजे

जिम केल्यानंतर शरीरातील ऊर्जा कमी होते. जिममुळे खूप ऊर्जा खर्च होते. हि ऊर्जा भरून काढण्यासाठी जिम नंतर प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन केलं पाहिजे. जिमपूर्वी हे प्रोटीन घेतले तर जिममध्ये ते लगेच खर्च होते आणि त्याचा शरीराला फायदा होत नाही. जिम नंतर प्रोटीनयुक्त आहार घेतल्यास शरीराला प्रोटिन्स मिळते आणि बॉडी बनायला मदतही होते. तसेच प्रोटीनयुक्त पदार्थं पचायला जड असतात त्यामुले जीम अगोदर खाल्यास जिमदरम्यान त्रास होऊ शकतो.

पुरेसा आराम करा

आहार, व्यायाम बरोबर शरीराला आरामाची सुद्दा तेवढीच गरज असते. पुरेशी झोप आणि आराम जर नाही घेतला तर काही आजार जसे मधुमेह सारखे आजार होऊ शकतात त्यामुळे जिम ला जाणे तर आवश्यक आहेच पण पुरेसा आरामही तेवढाच आवश्यक आहे. त्यामुळे कधी खूप धावपळ झाली आणि पुरेशी झोप झाली नाही तर अशावेळी जिमला जाणे टाळावं.

वरील सर्व गोष्टी लक्षात ठेऊन जिम जर केली तर तुमचं शरीर निरोगी राहून बॉडी बनायलाही मदत होईल.

Share This News

Related Post

टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्ण पदकं

Posted by - June 12, 2022 0
टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांच्या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात…
Ashutosh Sharma

Ashutosh Sharma : युवराज सिंहचा ‘तो’ विक्रम मोडणारा आशुतोष शर्मा यंदाच्या IPL मध्ये झळकला

Posted by - April 5, 2024 0
आशुतोष शर्माने (Ashutosh Sharma) पंजाब किंग्सला गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. IPL 2024 च्या 17 व्या…

बोधकथा : स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विशेष; ‘हि’ बोध कथा तुमचे आयुष्य बदलेल !

Posted by - January 12, 2023 0
बोधकथा : स्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ – ४ जुलै, १९०२, नरेंद्रनाथ दत्त) हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते.…
KL Rahul

PAK Vs IND : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये केएल राहुलची एन्ट्री होताच ‘या’ खेळाडूला मिळणार डच्चू

Posted by - September 7, 2023 0
कोलंबो : आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया सुपर 4 मधील पहिला सामना (PAK Vs IND) हा 10 सप्टेंबरला खेळणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *