दिवाळी स्पेशलमध्ये पाहुयात भाजणीची कुरकुरीत काटेदार चकलीची खास रेसिपी

301 0

काल आपण चकलीसाठीचे भाजणीचे पीठ कसे बनवायचे हे पाहिले सर्व जिन्नस योग्य प्रमाणात घेतले की चकली हमखास कुरकुरीत आणि काटेदार होणारच आणि लवकर मऊ देखील पडणार नाही चला तर मग पाहूयात आता भाजणीचे पीठ करून झाल्यानंतर चकली बनवण्याची कृती तत्पूर्वी पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य… 

साहित्य : भाजणीचे पीठ, पाणी, तिखट, हळद, तेल, मीठ, तीळ

कृती : सर्वप्रथम एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवा. या पाण्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तिखट, एक छोटा चमचा हळद, मीठ आणि पांढरे तीळ घालावे या पाण्याला चांगली उकळी येऊ द्या.

आता आपल्याला उकड घेण्याची तयारी करायची आहे. त्यासाठी हे पाणी उकळल्यानंतर यामध्ये भाजणीचे पीठ घालून चांगले हलवून घ्या. आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून थंड होण्यासाठी ठेवा.

अधिक वाचा : दिवाळी स्पेशलमध्ये पाहूयात खमंग, कुरकुरीत चकली बनवण्यासाठी भाजणीचे योग्य प्रमाण

यानंतर हे संपूर्ण मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या. आवश्यकतेनुसार पाण्याचा हात लावून हे मिश्रण घट्टसर भिजवून घ्या. मध्यम चांगले पीठ मळून झाल्यानंतर तेलाचा हात लावून पुन्हा दहा मिनिटांसाठी तसेच झाकून ठेवा.

See the source image

तोपर्यंत कढईमध्ये तळणीसाठी तेल घ्यावे. आता हे पीठ पुन्हा एकदा चांगले मळून घेऊन लहान लहान आकाराचे गोळे तयार करा, आणि सोऱ्यामध्ये चकलीची जाळी लावून मस्त गोलाकार चकली पाडून घ्या. तेल चांगले उकळल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. आणि सर्व चकल्या खमंग अश्या तळून घ्यायच्या आहेत.

चकली तळताना लक्षात ठेवा की चकली सारखी हलवायची नाही, एकदा तेलात सोडल्यानंतर तिला जास्तीत जास्त तीन ते चार वेळा दोन्ही बाजूने खमंग तळून घ्या.

Share This News

Related Post

SPECIAL REPORT

SPECIAL REPORT: सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीत धुसफूस

Posted by - March 28, 2024 0
सांगली : संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचा पडघम वाचला असून महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदार…

आज काय भाजी करावी विचार करताय ? ढाबा स्टाईल ‘दाल तडका’ असा बनवा सोप्या पद्धतीने

Posted by - November 11, 2022 0
गृहिणींना रोज सतावणारा प्रश्न म्हणजे आज काय भाजी करावी . रोज वेगळा तरी काय तरी करणार. तर मग आज सोप्या…

भजन सम्राट अनुप जलोटा आणि युवा गायक जावेद अली यांना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा 14 वा स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार

Posted by - November 8, 2022 0
पुणे : रौप्य महोत्सव साजरा करीत असलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे सांगीतिक क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकारास स्व. राम कदम कलागौरव…
Satara News

Satara News : आई-लेकराची झाली चुकामुक ! विहिरीत आढळले बिबट्याचे पिल्लू

Posted by - December 2, 2023 0
सातारा : नाशिक आणि रत्नागिरीमध्ये वस्तीत आलेल्या बिबट्याला रेस्क्यू केल्याची घटना ताजी असताना आता साताऱ्यामधून (Satara News) एक अशीच एक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *