माळीण दुर्घटनेला 8 वर्ष पूर्ण ; एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं

155 0

दुभंगली धरणीमाता कोपलं आभाळ गेले सोडून जीवाभावाचे मैतर युगायुगाच

माळीण दुर्घटना : 30 जुलै 2014 तो भयाण दिवस याच दिवशी होत्याचं नव्हतं झालं माळीण गावावर पहाटे काळरुपी डोंगर कोसळला अन् काहीच क्षणात होत्याचं नव्हतं. पुणे जिल्ह्यातील माळीण गाव डोंगराखाली गाडलं गेलं, त्याला आज आठ वर्ष लोटली .

माळीण दुर्घटना: ६ वर्ष पूर्ण, आपण काय धडा घेतला?

आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. पहाटे तीनच्या सुमारास गावकरी गाढ झोपेत असतानाच, काळानं गावावर घाला घातला. डोंगरकडा कोसळून त्याखाली जवळपास 44 घरं जागीच गाडली गेली होती. आणि सुमारे 725 वस्तीचं हे गाव होत्याचं नव्हतं झालं.

माळीण दुर्घटना: ६ वर्ष पूर्ण, आपण काय धडा घेतला?

डिंभे धरणामुळं विस्थापित झालेल्या लोकांचं पुनवर्सन माळीण गावात करण्यात आलं होतं. प्रामुख्यानं आदिवासी शेतक-यांची घरं गावात होती. पण निसर्गाचा कोप झाला आणि हे गाव डोंगराखाली गाडलं गेलं. केवळ घरं आणि माणसंच नाहीत, तर जनावरं आणि गावचं मंदिर देखील या आपत्तीमध्ये उद्धवस्त झालं.

सरकारी असंवेदशीलतेचे खून | तळीये - सुतारवाडी व्हाया माळीण | Navarashtra  (नवराष्ट्र)

हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेलं माळीण गाव… कायमचं काळाच्या उदरात गडप झालंय. आता उरलीय ती फक्त चिखलमाती… अशीच परिस्थिती आजपासून बरोबर 8 वर्षांपूर्वी निर्माण झाली होती.

Share This News

Related Post

अर्थकारण : तुम्हाला माहित आहे का ? लॉकरमधील दागिन्यांचाही असतो विमा; वाचा सविस्तर प्रकिया

Posted by - October 28, 2022 0
अर्थकारण : सध्या वाढते चोरी आणि दरोड्यांचे प्रमाण पाहता प्रत्येक घराच्या करत्या पुरुषाला आणि गृहलक्ष्मीला काळजी असते ती लॉकर मधल्या…

प्रथा-परंपरा : नागपंचमीच्या दिवशी भाज्या चिरायच्या नाही, तवा तापवायचा नाही ; पण का ? हे आहे कारण

Posted by - August 2, 2022 0
प्रथा -परंपरा : नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया…

व्हॉट्सॲपने लॉन्च केलं नवीन फीचर ; वाचा काय आहे नवीन फीचर

Posted by - March 19, 2022 0
अलीकडच्या काळात व्हॉट्सॲपने अनेक फीचर्स लॉन्च केले आहेत. आता या ॲपने पुढचे पाऊल टाकत एक नवे फिचर युजर्ससाठी आणले आहे.…

भारताच्या शत्रूच्या छातीत धडकी भरवणारी पाणबुडी INS वागशीर आहे तरी कशी ?

Posted by - April 16, 2022 0
नवी दिल्ली- भारताच्या शत्रूंची झोप उडवण्यासाठी देशाची सागरी सीमा अभेद्य आणि अखंड ठेवणारी आतापर्यंतची सर्वात आधुनिक पाणबुडी INS वागशीर लवकरच…

कार्डलेस कॅश विड्रॉल सुविधा म्हणजे काय ? जाणून घ्या महत्वाची माहिती

Posted by - April 18, 2022 0
भारतात बँकिंग क्षेत्रात वेगानं डिजिटलायझेशन झाल्याचं पाहायला मिळतंय. पहिल्यांदा आपल्याला पैसे काढण्यासाठी बँकेत जावं लागत होतं, नंतर एटीएम कार्डच्या रांगेत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *