निर्मलवारीसाठी पुणे जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज

287 0

 

पुणे: जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मलवारीसाठी यंत्रणा सज्ज ठेवली असून जगद्गुरू संत तुकाराम पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाल्यानंतर देहू नगरीतील रस्त्यांची त्वरीत स्वच्छता करण्यात आली.

देहू परिसराची झाडलोट व स्वच्छता करून कचरा संकलित करण्यात आला आणि कचऱ्याचे उचित व्यवस्थापन करण्यात आले. अन्नपदार्थ, पत्रावळी अशा स्वरुपाचा १४ टन ओला कचरा व इतर कचरा, तसेच ६५० किलो प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मुक्काम विसावा निवारा व रस्त्याच्याकडील कचरा तसेच परिसरातील स्वच्छता करून गाव स्वच्छ सुंदर व निर्मल ठेवण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा परिषद पुणे मार्फत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर प्रत्येकी २०० कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा पुढे गेल्यावर स्वचछता करण्यासाठी २५० स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी मुक्काम, विसावा, निवारा व रस्त्याच्या कडेलाही स्वच्छतेसाठी कचराकुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालखी मुक्कामच्या एक दिवस अगोदर कचराकुंडी उभारण्यात येणार असून पालखी प्रस्थान झाल्यानंतर तात्काळ परिसरातील झाडलोट करून घनकचरा प्रकल्प केंद्र ठिकाणी प्रक्रियेसाठी दिला जाणार आहे, अशी माहिती वाघमारे यांनी दिली आहे.

Share This News

Related Post

वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी 2022’ ॲप

Posted by - June 20, 2022 0
पुणे:- आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोई-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘आषाढी वारी…
Sanjay Kakde

Shivajirao Bhosle Bank Case : संजय काकडे यांच्यासंबंधी प्रकरणात व्याजासह थकीत कर्जवसुली करावी; विकास कुचेकरांची मागणी

Posted by - February 27, 2024 0
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात संजय काकडे यांच्यासह त्यांच्या संबंधित कंपन्यांना बेकायदेशीर कर्जे दिली आहेत. कर्ज देताना…
Pune News

Pune News : सर्वसामान्यांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी मोदींनी प्रयत्न केले – ब्रजेश पाठक

Posted by - February 28, 2024 0
पुणे : आजवर सरकार दिल्ली आणि मुंबईतून चालायचे. परंतु योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचल्या की नाही हे कधी विचारले (Pune News) नाही.…
Pimpri-Chinchwad Crime

Pimpri-Chinchwad : धक्कादायक ! ‘ती’ चूक पडली महागात पती-पत्नीचा भीषण अपघात ; CCTV फुटेज आले समोर

Posted by - May 1, 2024 0
पिंपरी चिंचवड : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेईना. पिंपरी चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad) अशीच एक अपघाताची घटना समोर आली…
Pune News

Pune News : विद्यार्थी प्रश्नावर चर्चा व निवेदन देण्यासाठी विद्यापीठात विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाने घेतली कुलगुरुंची भेट

Posted by - August 22, 2023 0
पुणे : आज दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाने विद्वयापीठामधील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मा. कुलगुरू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *