Women's Reservation

Women’s Reservation : महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

245 0

नागपूर : समाजकारण व राजकारणामध्ये महिला आपला वेगळा ठसा उमटवत असून महिलांना राजकीय आरक्षणामुळे (Women’s Reservation) या क्षेत्रात त्यांना अधिकची संधी निर्माण होणार आहे. महिला धोरणांमुळे समाजात सकारात्मक बदल दिसू लागतील असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. विधान भवनात आयोजित राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात संसदीय लोकशाही व महिला धोरण या विषयावर अभ्यास वर्गासाठी सहभागी झालेल्या विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी विधानमंडळ सचिव (कार्यभार 2) विलास आठवले, दैनिक सकाळच्या नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे, विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महिला आज सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत आयएएस, आयपीएस, न्यायाधीश यासह क्रीडा क्षेत्रात महिलांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आजच्या समाज माध्यमांच्या क्षेत्रातही त्या उत्कृष्टपणे काम करीत आहेत. या विविध क्षेत्रातील सहभागामुळे समाजात महिलांबद्दल अधिक आदर निर्माण होत आहे. महाराष्ट्र राज्य, महिलांना संधी देण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. यामुळे राज्यातील महिलांनी शिक्षण,राजकारण, क्रीडा प्रशासन अशा सर्वच क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी, महिला प्रश्नांचा अजेंडा अधिक समोर आणण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, 1990 साली तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्यासोबत महिला आघाडीची बैठक झाली. त्यामध्ये महिला आरक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग तयार करण्यात आला. घटना दुरुस्ती नंतर स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना आरक्षण लागू झाले. मात्र हे आरक्षण लोकसभा राज्यसभा निवडणुकीत लागू नव्हते. संसदेच्या 2023 च्या पावसाळी अधिवेशनाची महिला सक्षक्तीकरणाच्यादृष्टीने ऐतिहासिक पर्व म्हणून नोंद झाली आहे. ‘नारी शक्ती वंदन अभियान’ या नावाने सादर केलेल्या 128 व्या घटना दुरूस्ती विधेयकावर संमतीची मोहोर उमटल्याने यापुढे लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये किमान 33 टक्के महिला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात घेतलेला पुढाकार निश्चितच आश्वासक ठरला असल्याचेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

या संसदीय अभ्यास वर्गातील अनमोल मार्गदर्शनामुळे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व निश्चितच विस्तारेल. तसेच महिला सबलीकरण आणि महिलांच्या राजकीय सहभागाबाबत त्यांचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक आणि आश्वासक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी दैनिक सकाळच्या नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी शंतनू अहिर यांनी आभार प्रदर्शन केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Devendra Fadnavis : ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी करणारे पोलिस बडतर्फ होणार; फडणवीसांची मोठी घोषणा

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

Beed News : ‘या’ कारणामुळे प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्ला रोखता आला नाही; बीडच्या पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा

Amravati News : अमरावतीमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर पलटी होऊन 20 मजूर जखमी

Weather Update : राज्यात थंडीला सुरुवात; मात्र ‘या’ ठिकाणी आज पडणार पाऊस

Maratha Reservation : राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

Share This News

Related Post

श्रीमती इंद्राणी बालन यांच्या स्मरणार्थ नवी पेठेतील  श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचा जिर्णोद्धार

Posted by - July 3, 2024 0
पुणे, प्रतिनिधी – श्रीमती इंद्राणी बालन यांच्या स्मरणार्थ नवी पेठ येथील तब्बल १३८ वर्षे पुरातन श्री. विठ्ठल–रुख्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात…

भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशी आयोगाच्या प्रश्नांना शरद पवार यांनी दिली रोखठोक उत्तरे, काय विचारले प्रश्न ?

Posted by - May 5, 2022 0
मुंबई- भीमा कोरेगाव इथं घडलेल्या हिंसचाराची चौकशी करणाऱ्या जे. एन. पटेल आयोगासमोर आज शरद पवार यांची साक्ष नोंदवली गेली. आयोगाच्या…

व्यक्तिगत हेवे – दावे काढण्याच्या हेतूने, ‘माध्यमां समोर पक्षाचे जाहीर धिंडवडे काढणाऱ्यांवर’ काँग्रेस पक्षाध्यक्षांनी प्रथम कारवाई करावी – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

Posted by - January 18, 2023 0
पुणे : राज्यातील काही असंतुष्ट नेते, व्यक्तिगत राजकीय – अस्तित्वा साठी सत्यजित तांबे व मा हंडोरे प्रकरणीचे निमित्ताने व्यक्तिगत हेवे-दावे…

#PUNE : PMPMLची सेवा पूर्ववत करावी : जगदिश मुळीक

Posted by - March 6, 2023 0
पुणे : पीएमपीएमएलच्या बस ठेकेदारांनी अचानकपणे पुकारलेल्या संपासंदर्भात पीएमपीएल चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांची आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या…

…..त्यामुळे शिंदे फडणवीसांनी घेतलेले निर्णय वादग्रस्त आहेत -प्रकाश आंबेडकर

Posted by - July 30, 2022 0
पुणे:राज्यात एकनाथ शिंदे गटाचे सरकार आले.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची नव्हती तरी. त्यांना उपमुख्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *