स्वमग्न मुलांच्या थेरपी सेंटर साठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार – संदीप खर्डेकर

33 0

स्वमग्न मुलांच्या समस्या खूप वेगळ्या असून त्यांचा दिनक्रम बघितल्यावर आणि त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल ऐकून त्यांच्या वेदनांची कल्पना येते असे संदीप खर्डेकर म्हणाले.अश्या मुलांसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे ही संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आज गुरुनानक देव यांच्या 555 व्या जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त प्रसन्न ऑटिझम सेंटर येथील मुलांसाठी विविध उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,प्रसन्न ऑटिझम सेंटर च्या कार्यकारी संचालिका साधना गोडबोले, संचालक सुभाष केसकर व स्वमग्न विद्यार्थी उपस्थित होते.
केंद्र सरकारने दिव्यांग जनांच्या यादीत स्वमग्न मुलांचा समावेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार च्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना साधनाताई गोडबोले यांनी ” राज्य सरकार ने अश्या मुलांसाठी थेरपी सेंटर उभरावेत ” अशी अपेक्षा व्यक्त केली.
पुणे मनपा तर्फे देखील अश्या मुलांच्या संगोपन व उपचारासाठी केंद्र उभारावेत यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
भावी काळात ही ह्या मुलांना सर्वतोपरी मदत करण्याचे वचन नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट चे विश्वस्त मनोज हिंगोरानी आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर यांनी दिले.

Share This News

Related Post

मूत्रपिंड प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तावरे निलंबित

Posted by - April 15, 2022 0
पुणे- येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये झालेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय तावरे यांच्यावर निलंबनाची कारवाई…
Chandrakant and Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांच्या एंट्रीमुळे आता पुण्याचा पालकमंत्री बदलणार ?

Posted by - July 4, 2023 0
पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसह (Ajit…
Pune News

Pune News : पुणे तेथे काय उणे ! पुस्तक महोत्सवात चीनचा ‘तो’ रेकॉर्ड मोडत पुणेकरांनी स्थापन केला नवा विश्वविक्रम

Posted by - December 14, 2023 0
पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर (Pune News) उद्या शनिवारी 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक…

Special Report : पहिला श्रावणी सोमवार ! ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी…(VIDEO)

Posted by - August 1, 2022 0
आज श्रावणमासाचा पहिला सोमवार … श्रावणी सोमवार आणि या दिवशी करण्यात येणारे व्रत हे अत्यंत फलदायी असते . शिवपार्वतीची आज…
Pune News

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या महाविजय संकल्प सभेचे आयोजन

Posted by - April 27, 2024 0
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pune News) यांची पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविजय संकल्प सभेचे आयोजन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *