divorce

असाही एक घटस्फोट, पत्नीने सोडला पोटगीचा हक्क आणि….

4327 0

पुणे : आजकाल घटस्फोट (Divorce) झाला कि पतीला आपल्या पत्नीला पोटगी (Alimony) द्यावी लागते. मात्र कधी पत्नीने घटस्फोटादरम्यान आपल्या पत्नीला पोटगी दिल्याचे ऐकले आहे का? नाही ना… अशी दुर्मिळ गोष्ट क्वचितच पाहायला किंवा ऐकायला मिळते. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. यामध्ये एका पत्नीने पतीला कायमस्वरूपी 50 हजार रुपये पोटगी दिल्याची दुर्मिळ घटना घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
यामध्ये एका उच्चशिक्षित पत्नीने पतीविरोधात घटस्फोटासाठी दावा दाखल केला. यामध्ये उत्पन्नाच्या माहितीचे शपथपत्र दाखल करण्यात आले. मात्र हे शपथपत्र खोटे असल्याचे पतीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर पत्नीने पोटगीचा हक्क सोडून दिला. याउलट पत्नीला पतीलाच पोटगी द्यावी लागली. यानंतर ऑगस्ट 2018 मध्ये दाखल केलेला दावा परस्पर संमतीने करून निकाली काढण्यात आला. सातवे सह दिवाणी न्यायाधीश एस.व्ही.फुलबांधे यांच्या न्यायालयात हा निकाल झाला.

माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी या प्रकरणातील पती- पत्नीची नावे आहेत. माधवच्या वतीने अ‍ॅड. नरेंद्र बाबरे यांनी काम पाहिले. या प्रकरणातील पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित आहेत. पत्नीचे एम.टेक, तर पतीचे बी.टेक पर्यंत शिक्षण झाले आहे. ऑगस्ट 2018 मध्ये या दोघांचा विवाह झाला होता. सुरुवातीचा काही हा चांगला गेला मात्र त्यानंतर वैचारिक वादावरून दोघात खटके उडू लागले. यानंतर त्यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. 10 जानेवारी 2020 पासून दोघे विभक्त राहत आहेत. 3 मार्च 2020 रोजी पत्नीने आपल्या पतीविरोधात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. यानंतर दोघांनी एकमेकांविरोधात पोटगी मागणीचा अर्ज दाखल केला.

यानंतर या दोघांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशाप्रमाणे न्यायालयात संपत्ती व उत्तरदायित्व बाबतचे शपथपत्र दाखल केले. यानंतर पतीची बाजू मांडणारे वकील अ‍ॅड. नरेंद्र बाबरे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी पत्नीने दिलेली माहिती खोटी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पत्नीने पोटगी मागण्याचा अधिकार कायमस्वरूपी सोडून दिला. यानंतर पत्नीलाच आपल्या पतीला 50 हजार रुपये पोटगी द्यावी लागली. यानंतर हा घटस्फोट मंजुर करण्यात आला. आता दोघांमध्ये कसलीही देवाण-घेवाण नाही आहे. तसेच दोघांनी एकामेकांविरोधात दिवाणी अथवा फौजदारी खटला दाखल न करण्याचे ठरवले आहे.

Share This News

Related Post

…..त्यामुळे शिंदे फडणवीसांनी घेतलेले निर्णय वादग्रस्त आहेत -प्रकाश आंबेडकर

Posted by - July 30, 2022 0
पुणे:राज्यात एकनाथ शिंदे गटाचे सरकार आले.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची नव्हती तरी. त्यांना उपमुख्यमंत्री…

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीमध्ये चिमुकला पडला 15 फूट खोल बोअरवेलमध्ये; युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू

Posted by - March 13, 2023 0
अहमदनगर ,कोपर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी या गावांमध्ये एक 5 वर्षाचा चिमुकला बोरवेलमध्ये पडल्याची घटना घडली आहे.  हा चिमुकला 15…

नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच – सभागृह नेते गणेश बिडकर

Posted by - February 17, 2022 0
शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांच्या सुधारणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. यामध्ये ‘नदीचे केवळ सुशोभिकरण नव्हे तर नदीची सुधारणाच’ केली जाणार…

पुण्यातील कासेवाडी पोलीस चौकीत तीन महिलांचा गोंधळ, महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

Posted by - June 4, 2022 0
पुणे- पुण्यातील कासेवाडी परिसरातील पोलीस चौकीत तीन तरुणींनी गोंधळ घालत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली…

केंद्राकडून सुरक्षा पुरवणं हे राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण- दिलीप वळसे पाटील

Posted by - April 19, 2022 0
नागपूर-सध्या राज्यात भोंग्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा पुरवली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *