कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करून १५० फिरते हौद कशासाठी ? सजक नागरिक मंचाचा सवाल ! पाहा काय केली मागणी

321 0

पुणे : यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त होत असताना विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी विसर्जन हौद, टाक्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. असे असताना पुन्हा एकदा फिरते विसर्जन हौदाची व्यवस्था करून १ कोटी ३५ लाख रुपयांची उधळपट्टी केली जात आहे का असा प्रश्न निर्माण होतोय.

यंदाच्या वर्षी कोणतेही कोरोना निर्बंध नसल्याने २०१९ प्रमाणे गणेश विसर्जनासाठी ४६ हौद , ३५९ लोखंडी टाक्या , १९१ मूर्ती संकलन केंद्रे अशी व्यवस्था असणार आहे. त्यातच वाहत्या पाण्यातच विसर्जन केले जाणार आहे. असे असतानाही १ कोटी ३५ लाख रुपये खर्च करून तब्बल १५० फिरते विसर्जन हौद ही भाड्याने घेतला जात आहे. त्याची निविदा प्रक्रिया दोन दिवसात सुरू होणार आहे. ऐन कोरोनाच्या काळात केवळ ६० हौद असताना आता १५० हौद कशासाठी, जनतेच्या १.३५ कोटी रुपयांची उधळपट्टी का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

नागरिकांची मागणी नसतानाही व प्रशासनातील अधिकाऱ्यांचा विरोध असतानाही काही जणांसाठी ही निविदा प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोप केला जात आहे. हा निर्णय शहराच्या हिताचा नाही, त्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी सजक नागरिक मंचाच्यावतीने केली जात आहे. या बाबत सजक नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना काय माहिती दिली पाहूया…

Share This News

Related Post

ऐन दिवाळी ST प्रवाशांचं निघणार दिवाळं! 21 ते 31 ऑक्टोबर दरम्यान STची 10 टक्के हंगामी भाडेवाढ

Posted by - October 15, 2022 0
एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला…
Pune News

Pune News : केस कापायला पैसे दिले नाहीत म्हणून पतीकडून पत्नीला मारहाण

Posted by - September 11, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये (Pune News) एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये पत्नीने केस कापण्यासाठी पैसे न दिल्याने चिडलेल्या पतीने…
Crime

पुण्यात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच ! आंबेगाव पठार परिसरात अज्ञात टोळक्यानं नऊ वाहनं फोडली…

Posted by - August 21, 2022 0
पुणे: पुण्यात वाहन तोडफोडीच्या घटना काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीत. आंबेगाव पठार येथील स्वामी नगरमधील महारुद्र जिमच्या परिसरात 10…

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडींनी दिले पुन्हा सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत

Posted by - August 5, 2022 0
पुणे: माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी १० वर्षांनी पुणे महानगर पालिकेत दाखल झाले आहेत. आता नेहमी येत जाईन, अशी प्रतिक्रियाही…

उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्या पीएशी ओळख असल्याचे सांगून १० लाखांची फसवणूक

Posted by - March 2, 2022 0
पुणे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांच्या नावाने १० लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या दोन युवकांच्या विरोधात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *