गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता

258 0

पुणे : गुरुवारी पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे . त्याचप्रमाणे शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण आणि पारेशन कंपनीच्या कामासाठी पर्वती जल केंद्र आणि लष्कर जल केंद्र येथे देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्यामुळे गुरुवारी शहरास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

पर्वती जलकेंद्र मधून शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी ,राजेंद्र नगर ,लोकमान्य नगर ,डेक्कन ,शिवाजीनगर ,स्वारगेट ,पर्वती ,मुकुंद नगर पर्वती गाव, सहकार नगर ,सातारा रोड ,पद्मावती ,बिबवेवाडी ,तळजाई ,कात्रज, धनकवडी ,इंदिरानगर परिसर ,कर्वे रोड ,एसएनडीटी परिसर एरंडवणा ,कोथरूड परिसर ,डहाणूकर कॉलनी ,कर्वेनगर ,लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मिठा नगर ,शिवनेरी नगर ,भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर ,साईबाबा नगर या भागांना पाणीपुरवठा होत असतो तो गुरुवारी होणार नाही याची नोंद या परिसरातील नागरिकांनी घ्यायची आहे .

त्याचप्रमाणे लष्कर जलकेंद्र भागामध्ये लष्कर भाग ,पुणे स्टेशन, मुळा रस्ता ,कोरेगाव पार्क ,ताडीवाला रस्ता, रेस कोर्स परिसर ,वानवडी कोंढवा, हडपसर ,मोहम्मद वाडी ,काळेपडळ ,मुंढवा ,येरवडा परिसर ,विश्रांतवाडी ,नगर रस्ता ,कल्याणी नगर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी ,वडगाव शेरी ,चंदन नगर ,खराडी ,सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातव वाडी या भागाला लष्कर जलकेंद्रातून पाणीपुरवठा गुरुवारी होऊ शकणार नाही . याची नोंद या परिसरातील नागरिकांनी घ्यायची आहे.

Share This News

Related Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधातील अटक वॉरंट परळी कोर्टाकडून रद्द

Posted by - January 18, 2023 0
परळी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे उद्या बीडच्या परळी कोर्टामध्ये हजर राहणार आहेत चितावणीखोर वक्तव्य आणि मनसेच्या…

‘जेष्ठ नागरीक रेल्वेभाडे सवलत’ बंद केल्याबाबत मोदी सरकारचा तीव्र निषेध- गोपाळ तिवारी

Posted by - March 18, 2022 0
भारतीय रेल्वेद्वारे ५८ वर्षांवरील महिला आणि ६० वर्षांवरील पुरुष प्रवाशांना केंद्र सरकार  रेल्वे भाड्यात सवलत देत असे. प्रवाशांना दिलेल्या ‘सवलतीचा…
Pune News

Pulse Polio : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा 223 बालकांनी घेतला लाभ

Posted by - March 3, 2024 0
पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय पोलिओ लसीकरण (Pulse Polio) मोहिमे अंतगर्त आयोजित पल्स पॉलिओ लसीकरण मोहिमेला…

Deputy CM Devendra Fadnavis : “आता विस्तार झाला…सरकारही मजबूत …काहीही प्रश्न उपस्थितीत झाला नाही !”

Posted by - August 9, 2022 0
पुणे : शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून काही लोक बोलत होते. विस्तार झाला तर…

पर्यटकांसाठी खुशखबर..! सिंहगड ई -बस ट्रायलच्या फेऱ्यात

Posted by - March 15, 2022 0
ऑक्‍टोबर महिन्यापासून सिंहगडावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सिंहगडावर ई-बसेस सुरू करणे मागील काही महिन्यांपासून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *