Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ऐन सणासुदीच्या तोंडावर शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद

1809 0

पुणे : पर्वती जलकेंद्र, पंपिंग, रॉ वॉटर, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एस. एन. डी. टी. वारजे जलकेंद्र, नवीन होळकर, भामा- आसखेड, पंपिंग येथील विद्युत, पंपिंगविषयक आणि स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.31 ऑगस्ट ) रोजी उपनगरांसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि.1 सप्टेंबर ) रोजी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. बुधवारी रक्षाबंधन असल्याने महापालिकेने ऐन सणासुदीत पाणी बंदचा निर्णय घेतल्याने नागरिकांना सणांच्या दिवसात पाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

कोणत्या भागामध्ये पाणीपुरवठा राहणार बंद
सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्‍कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रस्ता, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वेरस्ता ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोनवरील मीठानगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्‍वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं. 42-46 (कोंढवा खुर्द), पर्वती टॅंकर भरणा केंद्र, पद्मावती टॅंकर भरणा केंद्र, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, चांदणी चौक, किष्किंदा नगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे-माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलर नगर, अतुलनगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध, बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता परिसर, लष्कर भाग, पुणे स्थानक, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडिवाला रस्ता, रेसकोर्स, वानवडी, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगररस्ता परिसर या ठिकाणी गुरुवारी आणि शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Share This News

Related Post

अमरावती आंतरधर्मीय विवाह प्रकरण : ‘ती’ बेपत्ता तरुणी अखेर साताऱ्यात सापडली; आज अमरावतीत आणण्यात येणार…

Posted by - September 8, 2022 0
अमरावती : अमरावतीमधील आंतरधर्मीय विवाह प्रकरणातील बेपत्ता तरुणी अखेर काल साताऱ्यात सापडली. आज तिला अमरावतीत आणण्यात येईल, अशी माहिती अमरावती…

‘पबजी’ गेमच्या वेडापायी पालघरमध्ये १६ वर्षीय मुलगा इमारतीवरून पडला

Posted by - May 16, 2022 0
पालघर- पबजी खेळताना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने १६ वर्षाचा मुलगा जखमी झाला. पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे रविवारी ही घटना…

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया… काय म्हणाले राऊत ?

Posted by - April 5, 2022 0
मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर ईडीने जप्त केलं आहे. या कारवाई नंतर संजय…

भर न्यायालयात आरोपीने थेट न्यायाधीशाच्या दिशेने….. मुंबईच्या कोर्टात घडली घटना

Posted by - April 3, 2023 0
दोन गुन्ह्यांमध्ये सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लवकर लागत नसल्याने संतापलेल्या आरोपीने न्यायाधीशांवर चप्पल फेकली. ही घटना शनिवारी कुर्ला येथील महानगर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *