पुणे : पुण्याचे फायरब्रॅन्ड नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ते पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रमुख राजकीय पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठीला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची देखील भेट घेऊन चर्चा केली होती. त्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी वसंत मोरे यांची भेट घेऊन त्यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. मात्र वसंत मोरे हे नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. यादरम्यान वसंत मोरेंनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
काय केला गौप्यस्फोट?
माझं भविष्य उज्वल आहे, थोडा वेळ घेतोय. तशीही पुण्यातील लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात आहे. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो आहे. काही दिवसांत महाविकास आघाडीची यादी जाहीर होईल. जे काही होईल ते चांगलं होईल. मला जे साध्य करायचं ते होणार आहे. मी योग्य दिशेने चाललोय, पुणेकरांचा विचार पण घेत आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. माजी वेळ योग्य आहे, आणि योग्य वेळी मी पक्ष सोडला आहे. अपक्ष लढलो तरी एक नंबरला राहील, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान 2022 लाच मला चंद्रकांत पाटील यांनी भाजपात येण्याची ऑफर दिली होती, ते म्हणाले आमच्याकडे या असा गौप्यस्फोटही वसंत मोरे यांनी यावेळी केला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Crime News : मुलीवरून 2 मित्रांमध्ये झाला वाद; गैरसमजातून मित्राने उचलले ‘हे’ पाऊल
Kolhapur Crime News : कोल्हापूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा; पोलिसांसमोरच केली दगडफेक