राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर वसंत मोरे काय म्हणाले ?

445 0

मुंबई- पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज मुंबईत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नेमके काय घडले याचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही. मात्र प्रसारमाध्यमांशी बोलताना वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

वसंत मोरे म्हणाले, “मी मनसेमध्ये होतो आणि मनसेमध्येच राहणार असून आजच्या भेटीनंतर 100% समाधानी आहे. उद्याच्या सभेत राज ठाकरे सर्व प्रश्नांना उत्तरं देणार असून पुढील चर्चा ही पुण्यात होईल असे देखील मोरे यांनी सांगितलं

आज राज ठाकरेंनी आपल्या निवासस्थानी शिवतीर्थावर बैठक बोलावली होती. या बैठकीला वसंत मोरे हजर होते. विशेष म्हणजे, वसंत मोरे हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे राज ठाकरेंनी तातडीने डॅमेज कंट्रोल करण्यात सुरुवात केली. याचा भागच म्हणून आजची बैठक आयोजित केली होती.

दरम्यान सर्व राजकीय पक्षांनी ऑफर दिल्यानंतरही आपण मनसेत राहणार असल्याची भूमिका वसंत मोरे यांनी स्पष्ट केल्यानं आता त्यांच्या राजकीय पक्षप्रवेशाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

काय आहे प्रकरण ?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे काढण्याची भूमिका जाहीर केली होती. एवढंच नाहीतर मोठाले स्पीकर लावून हनुमान चालिसा चालवण्याचे आदेशही राज ठाकरेंनी दिले होते. पण, त्यांच्या या निर्णयाला वसंत मोरेंनी स्पष्ट विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या राज ठाकरेंनी वसंत मोरे यांची शहराध्यपदावरून हकालपट्टी केली. वसंत मोरे यांच्यावर कारवाई झाल्यामुळे मनसेत खळबळ उडाली होती.

Share This News

Related Post

Farmer News

Farmer News : पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - December 29, 2023 0
मुंबई : राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना (Farmer News) सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या वतीने पीक कर्ज…
Sanjay Shirsat

Sanjay Shirsat : संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नये; शिरसाटांची महाजनांवर टीका

Posted by - March 31, 2024 0
नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत सुरु असलेल्या वादात आता भाजपची एन्ट्री होतांना पाहायला मिळत आहे. नाशिक…

15 ऑगस्टची सुट्टी रद्द ; योगी आदित्यनाथ सरकारचा निर्णय

Posted by - July 16, 2022 0
उत्तर प्रदेश : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत 15 ऑगस्ट या दिवशी उत्तर प्रदेश मधील सर्व शाळा,महाविद्यालये,सरकारी कार्यालय आणि खाजगी…

मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक संपन्न

Posted by - October 11, 2022 0
मुंबई : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Karuna Sharma

Karuna Sharma : करुणा शर्मांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला

Posted by - August 26, 2023 0
बीड : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्या गाडीवर बीडमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हल्ला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *