UPSC Results

UPSC Results : पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने UPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश

280 0

पिंपरी-चिंचवड : काल UPSC परीक्षाचा निकाल जाहीर झाला. या निकालात पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा देशात 359 वी रँक घेऊन यशस्वी झाला आहे. शुभम भगवान थिटे असे यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शुभमचे वडील भगवान थिटे हे पिंपरी चिंचवड पोलीस दलात सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. पाच वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर शुभम थिटेला यूपीएससी परीक्षेत यश मिळाल आहे.

फक्त सेल्फ स्टडी करून शुभम थिटेने यूपीएससी सारख्या अवघड परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे. लहानपणापासून अभ्यासात कुशाग्र असलेल्या शुभमच्या या यशामुळे त्याचे कुटुंब आनंदाने भारावलं आहे, त्याच्यावर पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2023 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. जानेवारी-एप्रिल 2024 दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 1016 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime : धक्कादायक! लग्नाच्याच दिवशी 28 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

Pune University : एक भेट पुणे विद्यापीठाला; विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी..!

Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर

Eknath Khadse : खळबळजनक ! एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

Astavakrasana : अष्टवक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

धक्कादायक : पूर्ववैमनस्यातून येरवड्यात दोन सराईत गुन्हेगारांचा खून; एक जण गंभीर जखमी

Posted by - November 12, 2022 0
पुणे : पूर्ववैमनस्यातून येरवड्यामध्ये दोघा सराईत गुन्हेगारांचा तलवार आणि कोयत्याने वार करून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या…
jagdish mulik

Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…

BIG BREAKING : कोथरूडच्या श्रावणधारा सोसायटीत भीषण आगीची घटना VIDEO

Posted by - November 17, 2022 0
पुणे : आताच मिळालेल्या माहिती नुसार कोथरुडमधील आशिष गार्डन जवळ, श्रावणधारा सोसायटीत एका फ्लॅट मध्ये भीषण आग लागली आहे. अग्निशमन…

” पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान ” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Posted by - September 3, 2022 0
पुणे : पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनरी पान आहे आणि यातून अनेक लोकांना प्रेरणा मिळाली आहे. समाजासमोर गुणवान व्यक्तींचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *