Shrikrishna Panse

University of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकपाल पदी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची नियुक्ती

298 0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (University of Pune) लोकपाल पदी प्रा.(डॉ). सुरेश गोसावी यांनी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची नियुक्ती केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे देशातील सर्वच विद्यापीठांमध्ये ‘लोकपाल’ नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या निर्देशांतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकृष्ण पानसे प्रामुख्याने विद्यापीठाच्या संस्थात्मक तक्रार निवारण कक्षाच्या आणि विद्यापीठ तक्रार निवारण कक्षाच्या निर्णयाविरूद्धच्या अपिलींवर सुनावणी करून निर्णय देण्याचे काम करतील. यामुळे आता विद्यार्थ्यांच्या तक्रारींच्या निवारणाला वेग मिळणार आहे.

लोकपाल नियुक्त करण्यासाठी विद्यापीठातर्फे त्रीसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने लोकपाल पदासाठी तीन जणांचा अभ्यास करून माजी न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांच्या नावाची निवड केली. त्यानंतर त्यांच्या नावाची शिफारस व्यवस्थापन समितीच्या बैठकीत करण्यात आली होती. त्यांच्या या शिफारसीला समितीने मान्यता दिल्यानंतर कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांनी श्रीकृष्ण पानसे यांची लोकपाल पदी नियुक्ती केली. श्रीकृष्ण पानसे हे सातारा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरून 2007 साली सेवानिवृत्त झाले. त्याआधी ते अमरावती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. तसेच केंद्र सरकारच्या औद्योगिक न्यायाधिकरण सह कामगार न्यायालयातही त्यांनी पीठसीन अधिकारी म्हणून काम केले आहे. ते सध्या विविध समित्यांवर तज्ञ म्हणून कार्यरत असून सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी संघ महाराष्ट्र याच्या अध्यक्षपदी आहेत. विद्यापीठात त्यांची ही नियुक्ती तीन वर्षाकरीता करण्यात आली आहे.

15 प्रकारच्या तक्रारींचा समावेश
विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय तक्रारींची दखल घेण्यासाठी विद्यापीठ स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करणे अनिवार्य केले आहे. या समितीच्या विद्यार्थ्यांशी संबंधीत एकूण 15 प्रकारच्या तक्रारी करता येणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांशी भेदभावपूर्ण वर्तन (लिंग, वंश, जात, वर्ग, पंथ, जन्मस्थान, धर्म व दिव्यांगता आदींवरून), कोणत्याही कारणास्तव संस्थेकडे विद्यार्थ्यांनी जमा केलेली प्रमाणपत्रे परत न करणे, प्रवेशामध्ये आरक्षण नियमांचे पालन न करणे, निश्चित केलेल्या फी व्यतिरिक्त जास्त पैसे आकारणे, शिष्यवृत्त्या न देणे, शुल्क परताव्याचे नियम न पाळणे, शैक्षणिक वेळापत्रकामध्ये दिल्याप्रमाणे परीक्षा न घेणे तसेच निकाल उशिरा लावणे, अपारदर्शी वा चुकीचे मूल्यांकन करणे, माहिती पुस्तिकेमध्ये आश्वस्त केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सुविधा न देणे अशा तक्रारींचा सामावेश असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : हिंगोलीमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Ashutosh Gowariker : मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : आशुतोष गोवारीकर

Talathi Bharti : तलाठी भरती संदर्भात मोठा घोटाळा समोर ! उमेदवाराला 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण मिळाले

Freedom of Information : माहिती अधिकार कट्ट्याचा 10 वा वर्धापन दिन साजरा

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडली; दाखला मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

Gondia Crime : गोंदिया हादरलं ! पैशांच्या वादामुळे टोळक्याकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

MI New Captain : पोलार्ड बनला मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन! स्पर्धेच्या तोंडावर फ्रेंचायझीकडून करण्यात आली घोषणा

Raj Thackeray : मी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

Share This News

Related Post

pune-police

पोलीस आयुक्तालयात दोन उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या; तर सात पोलीस उपायुक्त नवनियुक्त

Posted by - November 15, 2022 0
पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दोन पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. तर नव्यानेच बदलून आलेल्या सात पोलीस उपायुक्तांच्या…

नवीन वर्ष सगळ्या कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे- प्रशांत दामले

Posted by - April 2, 2022 0
अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत साहित्य गुढीचे पूजन पुणे- मराठी रंगभूमी ही प्रेक्षकांवर अवलंबून असून नाटक उत्तम होणे…

शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांना राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान

Posted by - March 11, 2022 0
पुणे- शास्त्रीय संगीताविषयी नव्या पिढीचे कान तयार करण्याचे काम युवा गायकांनी केले पाहिजेत असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी…
Pune News

Pune News : भूताच्या शोधात रात्रभर स्मशानात

Posted by - April 8, 2024 0
पुणे : उरुळीकांचनजवळील भवरापुर गावच्या स्मशानभूमीत (Pune News) लहान मोठे पन्नास जण शनिवारी रात्रभर मुक्कामी राहिले. तिथेच जेवले, स्वच्छता केली,…
ajit pawar and supriya sule

Ajit Pawar : अजित पवारांनी सुनंदा पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - May 1, 2024 0
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत आहे. या मतदारसंघात शरद पवार आणि अजित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *