University of Pune

University of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

427 0

पुणे : उच्च शिक्षणापासून कोणताही घटक वंचित राहू नये, तळागळातील प्रत्येक विद्यार्थी हा विद्यापीठाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अविभाज्य भाग आहे, ह्याच उत्तरदायित्वातून सर्वसमावेशक शैक्षणिक धोरणाच्या पुरस्कार आपण कायम ठेवला आहे. याच भूमिकेतून भविष्यातही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे लोकाभिमुख विद्यापीठ म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थेला पोषक असे आपले ध्येय धोरण आखत राहील आणि याचे कधीही विस्मरण होणार नाही, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित करत होते. याप्रसंगी विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोरील प्रांगणात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) पराग काळकार, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ.) विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी सीएमए चारुशिला गायके यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या परिषद सदस्य, अधिसभा सदस्य उपस्थित होते. देशासह विद्यापीठही यावर्षी आपले अमृत महोत्सव वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे यावर्षीचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा खास ठरला.

विपरीत परिस्थितीतही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे सर्वसामान्य समूह आणि घटकांचे विद्यापीठ आहे, याची जाणीव ठेवून, ही प्रतिमा कायम जपायचा विद्यापीठ निर्धार करत असल्याचे ही डॉ. गोसावी यावेळी म्हणाले. या संबोधनात विद्यापीठात राबविण्यात येत असलेले आणि भविष्यात राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांबद्दल त्यांनी माहिती दिली. तसेच विद्यापीठाच्या स्थापना दिनी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा डॉ. गोसावी यांनी यावेळी केली.

एनसीसीच्या संचलनपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमानंतर लहान मुलांना कुलगुरूंच्या हस्ते खाऊचे वाटप देखील करण्यात आले. याप्रसंगी विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्माचारी, विविध कर्माचारी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. युवा संगम उपक्रमांतर्गत पुण्यात आलेला आसामच्या विद्यार्थ्यांचा संघही यावेळी उपस्थित होता.

उत्कृष्ट महाविद्यालय / परिसंस्था पुरस्कार
१. व्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग)- ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे, इन्स्टिटयुट ऑफ इन्फरमेशन टेक्नॉलॉजी, पुणे ४११००१.
२. व्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग)- संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीचे, कॉलेज ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, ता. कोपरगाव, जि.अहमदनगर
३. अव्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, प्रा.रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्याल, आकुर्डी, पिंपरी चिंचवड, पुणे
४. अव्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग) – डांग सेवा मंडळाचे, दादासाहेब बिडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, पेठ, जि. नाशिक

उत्कृष्ट प्राचार्य / संचालक पुरस्कार
१. व्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग) – डॉ. पाटील मनोहर जनार्दन, मराठवाडा मित्र मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, पिंपरी रोड, थेरगांव, पुणे
२. अव्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग) डॉ. रसाळ पुंडलिक विठ्ठल मराठा विद्या प्रसारक समाजाचे जीएमडी कला बीडब्ल्यू वाणि आणि विज्ञान महाविद्यालय, ता सिन्नर, जि. नाशिक

उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार
१. व्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग)- डॉ. मुंजे रविंद्र कचरू कर्मवीर काकासाहेब वाघ इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग, एज्युकेशन अॅन्ड रिसर्च, पंचवटी, नाशिक
२. व्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग) – डॉ. सय्यद एतेशामुद्दीन शमशुद्दीन संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय, सहजानंदनगर, पो. शिंगणापूर, ता. कोपरगांव, जि. अहमदनगर
३. अव्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग) – डॉ. गणपुले शिल्पागौरी प्रसाद , प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड, पुणे
४. अव्यावसायिक अभ्यासक्रम विभाग (ग्रामीण विभाग)- डॉ. मगदुम सुजाता मार्तंड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दिंडोरी, ता. दिंडोरी जि. नाशिक

उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार
१. व्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग)- डॉ. आर अरोकिया प्रिया चार्ल्स डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्च, रावेत, आकुर्डी, पुणे
२. व्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग)- डॉ. खियानी सिमरन राजीव जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, पुणे-नगर रोड, वापोली, पुणे
३. अव्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग)- डॉ. भाकरे शरयु सुरेश, सिम्बायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सेनापती बापट रोड, पुणे
४.अव्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग) – डॉ. मुळे योगिनी रामकृष्ण, तुळजाराम चतुरचंद, बारामती, जि. पुणे

उत्कृष्ट नाविन्यपूर्ण विशेष उपक्रम / संशोधन पुरस्कार
१. डॉ. लोमटे बिना माधवराव – | रसिकलाल एम. धारीवाल सिंहगड टेक्निकल इन्स्टिटयूट्टस कॅम्पस, वारजे, मुंबई – बंगलोर बायपास, पुणे

उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार (शहरी विभाग)
१. शहरी विभाग – डॉ. नाईकवाडी प्रियांका विठ्ठल श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती, पुणे

उत्कृष्ट संचालक, शारीरिक शिक्षण व क्रिडा पुरस्कार
१. शहरी विभाग – डॉ. शेंडेंकर दीपक तानाजी, मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे
२. ग्रामीण विभाग – डॉ. जाधव नारायण माधव, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगांव, ता. निफाड, जि. नाशिक

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अध्यापकांचा सत्कार
१. डॉ. मारू अविश व्दारकादास, लोकनेते डॉ. जे. डी. पवार कॉलेज ऑफ फार्मसी, नूर, ता. कळवण, जि. नाशिक

उत्कृष्ट विद्यापीठ विभाग पुरस्कार (विज्ञान / तंत्रज्ञान विद्याशाखा )
१. वनस्पतिशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. संयुक्तपणे
विभागुन जैवतंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

युवा गौरव पुरस्कार (२०२३ – २४)
१. कला – श्री. माने मकरंद मधुकर – चित्रपट दिग्दर्शक व निर्माता
२. क्रीडा – 1) श्री. पुराणिक अभिमन्यू समीर – बुध्दिबळ
2) श्रीमती सोमण प्रणिता प्रफुल्ल – रोड सायकलिंग
3. साहित्य – श्री. जाधवर ज्ञानेश्वर प्रकाश – युवा साहित्य अकादमी पुरस्कार नामांकन व इतर

Share This News

Related Post

Pune News

Pune Crime News : पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी अपडेट; आता 2 तरुणी ATS च्या रडारवर

Posted by - July 27, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune Crime News) काही दिवसांपूर्वी 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील तिसरा आरोपी कातिल दस्तगीर…

‘टिंगरेचे उपोषण म्हणजे एक नौटंकी’ आमदार सुनील टिंगरे यांच्या आंदोलनावर भाजपची प्रतिक्रिया

Posted by - April 6, 2023 0
आपल्या मतदारसंघावर प्रशासनाकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची…

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतली कोविड टास्क फोर्सची बैठक; आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

Posted by - December 28, 2022 0
पुणे : परदेशात वाढणारी कोविड-१९ रुग्णांची संख्या लक्षात घेता या साथरोगाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच यातून निर्माण होऊ शकणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला…
accident

पुण्याच्या वाघोलीत ट्रकखाली सापडून 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Posted by - June 3, 2023 0
वाघोली : पुण्यातील वाघोलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बोअरवेल ट्रकखाली सापडल्याने दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा…
Pune News

Pune News : कुटुंब हळहळलं ! आई-वडिलांच्या लाडलीचा दुर्दैवी अंत

Posted by - November 26, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune News) खेड तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या कळमोडी धरण परिसरात असणाऱ्या घोटवडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *