Police pune

धक्कादायक ! पुणे पोलीस दलातील हवालदाराचा मृत्यू; दोन दिवसांपूर्वी झाले होते सेवानिवृत्त

1600 0

पुणे : पुणे (Pune) पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पुणे पोलीस दलात कार्य़रत असणाऱ्या पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी ते पोलीस दलातून निवृत्त झाले होते. प्रकाश अनंता यादव (Prakash Ananta Yadav) असे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. या घटनेमुळे यादव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

प्रकाश यादव हे बुधवारी (दि.31 मे) पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले होते. बुधवारी त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील (IPS Pravinkumar Patil) आणि पोलीस उपायुक्त संदीप सिंह गील (IPS Sandeep Singh Gill) यांच्याहस्ते यादव यांचा सत्कार करण्यात आला होता. सेवानिवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी यादव यांचा मृत्यू झाल्याने पुणे पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रकाश यादव हे पुणे पोलीस मुख्यालयात सी कंपनीत कार्यरत होते. ते पोलीस जीम ट्रेनर होते. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यासंह पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रकाश यादव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Share This News

Related Post

ऑनलाईन गेम खेळत असाल तर सावधान! तुम्हालाही बसू शकतो आर्थिक भुर्दंड

Posted by - April 16, 2023 0
सध्या ऑनलाइनचा जमाना आहे आणि या ऑनलाइनच्या काळात तरुणाईची पाऊल मोठ्या प्रमाणात ऑनलाइन गेमिंगकडे वळत चालली आहे. सध्या मुलं ऑनलाइन…
Vada Pav

Vada Pav : मुंबईच्या वडापावला सोलापूरचा झणझणीत ‘हा’ वडापाव देत आहे टक्कर? काय आहे स्पेशालिटी

Posted by - June 23, 2023 0
सोलापूर : महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांमध्ये वडापाव (Vada Pav) हा सर्वात फेमस पदार्थ आहे. अगदी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना हा वडापाव (Vada…

भाजपचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडेंच्या पत्नी उषा काकडे यांच्या अडचणीत वाढ

Posted by - January 30, 2023 0
पुणे : मेव्हण्याची बदनामी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपाचे  माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे व त्यांच्या पत्नी…

साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरणच सुरु ठेवावे; मुख्यमंत्र्यांची पत्राद्धारे प्रधान मंत्र्यांना विनंती

Posted by - October 18, 2022 0
मुंबई : साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे. कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *