दुर्दैवी! बिबट्याच्या हल्ल्यात 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू

555 0

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जांबुत गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली असून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 19 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही तरुणी कला शाखेत शिकत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, घराजवळील ऊसाच्या शेती जवळून तरुणी जात होती. त्याचवेळी बिबट्या शिकारीच्या शोधात दबा धरून बसला होता. त्याचवेळी त्या बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पूजा नरवडे असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या १९ वर्षीय तरुणीचे नाव आहे. पूजा नरवडेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाकडून आक्रोश करण्यात येत आहे. पूजाच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

जांबुत गावात यापुर्वी बिबट्याने एका बालकाचा व दोन महिन्यापुर्वी एका युवकावर हल्ला करुन ठार केले होते. पुन्हा याच गावात 19 वर्षीय युवतीवर हल्ला करून ठार केलेली ही तिसरी घटना असून जांबुत परीसरासह बेट भागातील नागरीक प्रंचड भयभीत झाले असून वन विभागाच्या कारभारावर संतप्त झाले आहे. तसेच आमदाबाद येथे सोनवणे यांच्या शेळीवर हल्ला करून ठार केले आहे.

Share This News

Related Post

MAHARASHTRA POLITICS : पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का ? – दिलीप वळसे पाटील

Posted by - January 13, 2023 0
मुंबई : पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का ? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि…
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : छत्रपती संभाजी महाराजांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

Posted by - June 26, 2023 0
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांना मनुस्मृती…

बेळगावात वाहनांवर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात वादळाची ठिणगी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक मुख्यमंत्री यांना केला फोन, म्हणाले….

Posted by - December 6, 2022 0
बेळगाव : बेळगावच्या हिरेबागवाडी येथे टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांनवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेने हल्ला केला आहे. यावेळी कर्नाटकमध्ये ही वाहने येऊ…
Ticket Booking

Ticket Booking : ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘हा’ चार्ज भरावा लागणार नाही

Posted by - February 8, 2024 0
लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर तिकिट (Ticket Booking) दोन ते तीन आठवडे बुकिंग करावे लागते. इतकंच नव्हे तर, सीझनच्या…

मोठी बातमी : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार मध्यस्थी; 14 डिसेंबरला होणार महत्त्वाची चर्चा

Posted by - December 9, 2022 0
नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्न मोठ्या प्रमाणावर चिघळल्याने महाराष्ट्रातील खासदारांनी आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *