Traffic News

Traffic News : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी; पुण्यात लांबच लांब रांगा

478 0

पुणे : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आज पुन्हा एकदा वाहतूक कोंडी (Traffic News) झाल्याचे पाहायला मिळत आहे. सुमारे 3 किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुठा नदी पूल परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे ही वाहतूक कोंडी (Traffic News) झाली आहे. मुंबई बंगळुरु नॅशनल हायवेवर वडगाव बुद्रुक येथील मुठा नदी पूल परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे.

Pune News: कौतुकास्पद ! पुणे पोलिसांच्या जवानांकडून ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांना अटक

नदी पुलापासून नवीन कात्रज बोगद्यापर्यंत ही वाहतूक कोंडी दिसत आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक, नागरिक, कामगार, विद्यार्थी हैराण झाले आहेत. वडगाव, धायरी, नऱ्हे, आंबेगाव परिसरातील सर्व सेवा,रस्ते या वाहतूक कोंडीमुळे ठप्प झाल्या आहेत.

Mumbai News : भारतीय शूटरच्या मदतीने दहशतवादी हल्ला करणार; मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज

पुढील दोन दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात आकाश पूर्णत: ढगाळ राहणार असून, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज ‘भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील आठवडाभर शहरात पाऊस हजेरी लावणार असल्याचे ‘आयएमडी’ने संकेत दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Share This News

Related Post

नाशिक पदवीधर निवडणूक: सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय

Posted by - February 3, 2023 0
नाशिक: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीला पराभव करत सत्यजित…

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा सोडला हात

Posted by - February 12, 2024 0
मुंबई : काँगेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला…

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडींनी दिले पुन्हा सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत

Posted by - August 5, 2022 0
पुणे: माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी १० वर्षांनी पुणे महानगर पालिकेत दाखल झाले आहेत. आता नेहमी येत जाईन, अशी प्रतिक्रियाही…

तिळगुळ घ्या गोड गोड बोला ! तिळगुळाचे गोड खुसखुशीत लाडू बनवण्याची सोपी रेसिपी

Posted by - January 13, 2023 0
मकर संक्रांति निमित्त आता घराघरामधून तिळगुळाच्या खमंग लाडवांचा वास पसरायला सुरुवात होते. थंडीच्या दिवसांमध्ये तीळ गुळ आणि दाणे यांच विशेष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *