काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरलेला दिसत नाही का म्हणून भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरायची वेळ

297 0

*काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरलेला दिसत नाही का म्हणून भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरायची वेळ आली -गौरव बापट

पुणे: ता २२- पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडी कडून आमदार रवींद्र धंगेकर हे मैदानात उतरलेले आहेत निवडणुकीचा प्रचार जोर धरताच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर आज दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरून त्यावर जो आमदार कसब्याचा तोच खासदार पुण्याचा अशा आशयाचा मजकूर टाकून तो प्रसारित केला याला खासदार गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट यांनी तीव्र आक्षेप घेतला काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा त्यांच्याच पक्षावर व नेतृत्वावर विश्वास नसल्याने त्यांना भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरण्याची वेळ आलेली आहे यावरून त्यांच्या पराभवाची मानसिकता दिसून येते जर स्वतःच्या पक्षावर आणि स्वतःच्या पदाधिकाऱ्यांवर व नेत्यांवर विश्वास असता तर अशा पद्धतीचे बालिश चाळे डांगे करांच्या कार्यकर्त्यांनी व धंगेकरांनी केलेच नसते असा आरोप श्री गौरव बापट यांनी केला

पुढे ते म्हणाले देशामध्ये पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी यांच्यावर जनतेने दाखवलेले प्रेम आणि विश्वास या जोरावरच भारतीय जनता पार्टीचे चारशेहून अधिक खासदार 100% निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे पुण्यातील उमेदवार श्री मुरलीधर मोहोळ हे देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे आमचे संपूर्ण हे भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात आगामी काळात हिरीरीने सहभाग घेऊन श्री मोहोळ यांना खासदार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असे प्रतिपादन गौरव बापट यांनी केले

Share This News

Related Post

मोठी बातमी ! नवनीत राणा यांचा लीलावती रुग्णालयातील मुक्काम वाढणार, उपचार सुरु

Posted by - May 6, 2022 0
मुंबई- जामिनावर सुटका झालेल्या खासदार नवनीत राणा या गुरुवारी लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. स्पॉन्डिलिसिस च्या आजारामुळे त्यांची तब्येत बिघडली. आज…

जनकल्याण समितीच्या ‘सेवा भवन’ प्रकल्पाचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हस्ते

Posted by - February 28, 2023 0
पुणे : रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हाती घेण्यात आलेला ‘सेवा भवन’ हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. या…

अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ; छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपसह विविध संघटना आक्रमक

Posted by - January 2, 2023 0
बारामती : “संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते ते स्वराज्य रक्षक होते.” असं विधान अजित पवार यांनी विधानसभेमध्ये केलं होतं. यावरूनच…

‘मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला, आमदारांनाही सोडलं, पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत’ गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली नाराजी

Posted by - June 29, 2022 0
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला, संघटना सोडली, आपल्यासारखे आमदार सोडले पण ते शरद पवार यांना सोडायला तयार…
Ajit Pawar

Ajit Pawar : ‘महावितरण’ची प्रलंबित व नवीन उपक्रेंद्रांची कामे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तातडीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Posted by - September 11, 2023 0
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांकडून होणाऱ्या वीजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) प्रलंबित कामे तातडीने पूर्ण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *