पुणे : वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात शेतकऱ्याच्या तीन गाई वीज पडल्याने ठार

383 0

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बेट भागात विजेच्या कडकडाट, वादळासह अवकाळी पाऊस झाला.शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे शुक्रवारी दि. २२ रात्री ८ च्या सुमारास वीज पडून सुभाष धोंडीबा खैरे या शेतकऱ्याच्या तीन गाई जागीच ठार झाल्याने अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सविंदणे येथील कारभारी नरवडे, अक्षय नरवडे यांच्या घरावरील कौले उडून गेली आहेत. सुभाष खैरे या शेतकऱ्याच्या तीन गाई वीज पडून जागीच ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे तीन लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. महसुल व पशुसंवर्धन विभागाने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी सरपंच सोनाली खैरे, रा.कॉ.युवक अध्यक्ष बाळासाहेब भोर यांनी केली आहे.शेतकऱ्यांनी नुकतेच काढलेले कांदे भिजले आहेत. मका, घास पीक भुईसपाट झाले. झाडावरील आंबे, डाळिंब गळून पडले. अवकाळी वादळी पावसाने विजेचा लंपडाव, कमी बाजारभाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

Share This News

Related Post

Raj Thackeray

Raj Thackeray : भाजपची ऑफर ते पवारांच्या भेटीगाठी; राज ठाकरेंनी सांगितलं लोकसभेचं प्लॅनिंग

Posted by - August 14, 2023 0
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरे (Raj Thackeray)…

चौदा वेळा थॉमस कप जिंकणाऱ्या इंडोनेशियाला धूळ चारत कोरलं थॉमस करंडकावर नाव

Posted by - May 15, 2022 0
जगातील नामवंत बॅडमिंटन स्पर्धा पैकी एक मानल्या जाणाऱ्या थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य ठरला आहे. या स्पर्धेची अंतिम…
Modi And Farmer

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ दिवशी अकाउंटमध्ये येणार पीएम किसानचा 14 वा हप्ता

Posted by - July 19, 2023 0
मुंबई : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसानचा 14 (PM Kisan Yojana) वा हफ्ता 28 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या…
Nashik News

Nashik News : इन्स्टाग्रामवरची मैत्री तरुणीला पडली महागात तिच्यासोबत घडलेल्या घटनेने ती हादरली

Posted by - October 22, 2023 0
नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियाचा अतिरेक इतका झाला आहे की, कोण कधी…

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेले कार्य प्रेरणादायी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Posted by - October 11, 2022 0
पुणे : जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेले कार्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *