चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण: पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचे हजारो कार्यकर्ते आक्रमक

168 0

चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. विचारांचा सामना विचारांनी करता येत नसल्यामुळे असामाजिक तत्त्वांनी जाणीवपूर्वक आणि इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने आदरणीय दादांवर शाईहल्ला केला. दादांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करुनही हा प्रकार घडला. या प्रवृत्तीविरोधात आणि विशेषत: हल्ल्याच्या सुत्रधारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत निषेध नोंदवला.

विश्वासघाताने आणि संधी साधूपणामुळे राज्यात आलेली सत्ता गेल्याने विरोधक सैरभैर झाले आहेत. राज्यातील शांततेचे वातावरण बिघडवून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करायचा विरोधक सतत प्रयत्न करीत आहेत. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता संयमी आहे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या मर्यादेत राहून काम करणार आहे.
यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरीताई मिसाळ, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,आमदार भीमरावअण्णा तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे प्रभारी धीरज घाटे, गणेश बीडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक पोटे, दिपक नागपुरे, दत्ताभाऊ खाडे, संदीप लोणकर, बापू मानकर, नगरसेवक, मंडल अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This News

Related Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

Posted by - January 3, 2023 0
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात स्वच्छता मोहीम

Posted by - September 17, 2022 0
पुणे: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण शहरभर १००० ठिकाणी स्वच्छता महाअभियान शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे नेतृत्वाखाली राबविले गेलं …
Eknath, Ajit, Devendra

आता प्रत्येक शाळेत घुमणार गर्जा महाराष्ट्र माझाचे स्वर; राज्य शासनाने घेतला ‘हा’ निर्णय

Posted by - March 17, 2024 0
School Education : शाळांमध्ये प्रार्थना , प्रतिज्ञा, राष्ट्रगीत अनिवार्य होतेच मात्र आता विद्यार्थ्यांना बालपणीच महाराष्ट्राची गौरवगाथा कळावी या करीता महाराष्ट्र…

महत्वाची बातमी : आज रात्री खडकवासला धरणातून केला जाणार पाण्याचा विसर्ग;नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

Posted by - July 11, 2022 0
पुणे: आज दि.11/07/2022 रोजी धरणाच्या पाणी पातळीमधील वाढ आणि पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज रात्री ठीक 12.00 वा. सांडव्यातून 856 क्युसेकने…
Pune Metro Timetable Changed

Pune Metro Timetable Changed : पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात उद्यासाठी करण्यात आला ‘हा’ बदल

Posted by - September 9, 2023 0
पुणे : पुणे मेट्रोमुळे पुणेकरांचा (Pune Metro Timetable Changed) प्रवास आता सुखकर होणार आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *