Pune Crime : 5 वर्षांपूर्वी घडलेल्या खुनी नाट्याचा थरार ; बहिण-भावानेच केला सख्या भावाचा निघृण खून ; असा झाला उलगडा…

602 0

पुणे : बहिण भावाच्या नात्याला काळीमा फासली गेली आहे प्रत्येक घरामध्ये वाद विवाद होतच असतात आई-वडिलांच्या मृत्यू नंतर प्रॉपर्टीच्या होणाऱ्या वादातून अनेक वेळा भावकीमध्ये अनेक वर्ष वाद सुरूच राहतात पण बऱ्याच वेळा हे वाद विकोपाला जाऊन हत्येपर्यंतचे कट रचले जातात.

पुण्यामध्ये पाच वर्षांपूर्वी असाच एक खून नाट्य थरार घडला होता कारण होतं केवळ घरातील एक खोली नावावर करून देण्याचं आईच्या मृत्यूनंतर 23 वर्षीय भाऊ घरातील एक खोली आपल्या नावावर करून द्यावी या कारणावरून रोजच आपल्या बहीण आणि भावाशी वाद घालत होता त्यासह आई जाण्याचं कारण देखील त्या दोघांनाच ठरवत होता याचाच राग मनात धरून सख्या बहिण भावानच एका मित्राच्या मदतीने 23 वर्षीय भावाला जबर मारहाण केली आणि त्यानंतर त्याला डेक्कन मधील कॅनॉलमध्ये फेकून दिले होते.

पोलिसांच्या क्षणाक्ष नजरेने हत्तीचा उलगडा केला आहे या घटनेमध्ये पंकज दिघे या 23 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला होता याप्रकरणी सख्खा भाऊ सुहास दिघे वय वर्ष 29 आणि बहिण अश्विनी अडसूळ यांच्यासह तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे सर्वजण एरंडवणा परिसरात राहत होते पंकज कोणतेही काम करत नव्हता तर घरातील एक खोली माझ्या नावावर करून द्या या कारणावरून घरात सातत्याने होणाऱ्या वादंगामुळे या बहिण भावाने टोकाचे पाऊल उचलले आहे.

ही घटना घडली होती पाच वर्षांपूर्वी अर्थात 14 मार्च 2017 रोजी या दिवशी मित्र महेश आणि प्रशांत यांच्या मदतीने पंकजला बेदम मारहाण करून कॅनॉल मध्ये ढकलून देण्यात आले होते पाचव्या दिवशी याविषयी डेक्कन पोलीस स्थानकामध्ये भाऊ सुहास यांनी पंकज ची मिसिंग कंप्लेंट दाखल केली पंकज चा मृतदेह कॅनॉल मधून वाहून हडपसर मध्ये मिळून आला होता त्यानंतर हडपसर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून शासकीय नियमानुसार अंत्यविधी देखील केला

असा झाला उलगडा
गुन्हे शाखा युनिट तीन पोलीस हवालदार राजेंद्र मारणे यांना बातमीदारामार्फत घडलेल्या प्रकरणाची माहिती मिळाली. वरिष्ठांशी केलेल्या चर्चेतून आणि मार्गदर्शनाने पंकजचे मिसिंग दाखल कुठे होते याचा शोध घेऊन , त्यानंतर डेक्कन येथील मिसिंगच्या आधारे मृतदेह कुठे आढळून आला याचा तपास करण्यात आला. हडपसर मध्ये मृतदेह आढळून आल्याचे समजले आणि त्यानंतर पोलिसांना ठोस दिशा मिळाली. परिसरात घडलेल्या घटने विषयी एक प्रत्यक्षदर्शी मिळून आला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, महेश धनावडे याला ताब्यात घेण्यात आलं. महेश धनावडे याला पॉलिसी खाक्या दाखवल्यानंतर अखेर या खुनी नाट्याचा उलगडा झाला.  पोलीस हवालदार राजेंद्र मारणे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

Share This News

Related Post

Yavatmal News

Yavatmal News : यवतमाळ हळहळलं ! पतीच्या ‘त्या’ छळाला वैतागून विवाहितेने 2 चिमुकल्यांसह घेतला जगाचा निरोप

Posted by - August 17, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये (Yavatmal News) माहेरवरून पैसे आणण्यासाठी पती सतत…

निवडणूक विषयक कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी कार्यशाळा उपयुक्त ठरेल – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Posted by - July 28, 2022 0
पुणे : निवडणूक प्रक्रियेतील अनुभवाची देवाणघेवाण व भविष्यातील नियोजन करताना तसेच निवडणूक विषयक कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी उप जिल्हा…
Mira Road Murder Case

मीरारोड हत्या प्रकरणात आरोपीने केला ‘हा’ मोठा खुलासा; म्हणाला ती माझ्या मुलीसारखी…

Posted by - June 9, 2023 0
मुंबई : मिरारोडच्या गीतानगरमध्ये एका व्यक्तीने लिव्ह इन पार्टनरची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस येताच मोठी खळबळ माजली होती. या…
Satara Accident

Satara Accident : सातारा-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू तर तरुणीचे..

Posted by - September 27, 2023 0
सातारा : राज्यात सध्या अपघाताचे (Satara Accident) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. म्हसवड येथील सातारा-पंढरपूर महामार्गावर मायणी चौकात दुचाकीला पाठीमागून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *