पुण्यासाठी पुढचे 48 तास महत्वाचे; हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा

185 0

पुणे: पुण्यात गेल्या आठवड्या पासून जोरदार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक पाऊस लोणावळा परिसरात सुरू आहे. या सोबतच खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू आहे.

दरम्यान, हवामान विभागाने या तालुक्यात असणा-या घाटमाथा परिसरात तुफान अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. येत्या ४८ तास हे महत्वाचे राहणार आहे. या पावसामुळे घाटात दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन दिवस बाहेर पडण्याचे टाळावे असे आवाहनही हवामान विभागाने केले आले आहे.

दरम्यान, पुणे शहरातही एलो अलर्ट हवामान विभागाने सांगितला आहे. पावसामुळे झाडपडीच्या घटना होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे बाहेर न पडता घरीच राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. पावसामुळे पुण्यातील धरणे जवळपास निम्मे भरली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही धरणे वेगाने भरली आहेत. पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसरातच ही धरणे असल्याने लवकरच ही धरणे पूर्ण भरणार आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडले जाणार आहे.

पुढील 48 तासांत हा मुसळधार पाऊस पुण्यासह मुंबई आणि घाटमाथ्यावर होणार आहे. 15 तारखेला पाऊस कमी होईल. तर त्यानंतर म्हणजेच 16 जुलैपासून वातावरणात पुन्हा बदल होऊन पावसाची परिस्थिती निर्माण होईल. मध्यम ते मुसळधार असा हा पाऊस असेल.

पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक या चार ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असे अनुपम कश्यपी यांनी सांगितले. कोकण, गोवा, पालघर, रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचे ते म्हणाले. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रवास करणे टाळावे. विशेषत: घाट माथ्याच्या परिसरातून प्रवास करू नये. असे आवाहन हवामान विभागाने केले आले आहे.

Share This News

Related Post

चॉकलेट खाण्यासाठी तो भारतीय हद्द ओलांडायचा, पण एके दिवशी…

Posted by - April 15, 2022 0
आगरतळा – चॉकलेट खरेदी करण्यासाठी बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत घुसलेल्या बांगलादेशी तरुणाला अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना सांगितले की,…

पुणे तिथे गुन्हेगारही नाहीत उणे ! जेएम रोडवर महिलेवर कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी देणारे चौघं गजाआड; दोन आरोपी अल्पवयीन !

Posted by - January 7, 2023 0
पुणे : पुण्यात सध्या गुन्हेगारीनं चांगलंच डोकं वर काढले. सर्रास रहदारीच्या रस्त्यांवर कोयते हॉकी स्टिक घेऊन, गुन्हेगार दहशत माजवण्याचा प्रयत्न…
Pimpri-Chinchwad

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरात टायरच्या गोडाऊनला भीषण आग

Posted by - February 21, 2024 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) मोरवाडी परिसरात टायरच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. एम्पायर इस्टेट इमारतीच्या…

” निकालाकडे पाहताना फारसा उत्साह वाटत नाही, ही साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे… ” अश्विनी जगताप यांची भावनिक प्रतिक्रिया

Posted by - March 2, 2023 0
चिंचवड : आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणी…

मातंग एकता आंदोलनच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी ऍड राजश्रीताई अडसूळ

Posted by - June 2, 2022 0
पुणे- मातंग एकता आंदोलनच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी ऍड राजश्रीताई अडसूळ यांची निवड करण्यात आली. मातंग एकता आंदोलनच्या राज्यव्यापी संघटनेच्या निर्धार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *