Pune Prakalp

पुण्यात तयार होणार पहिला कचर्‍यातून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प

564 0

पुणे : शहरात तयार होणाऱ्या महाकाय कचऱ्याच्या डोंगराची डोकेदुखी येत्या दिवाळीपर्यंत बंद होणार आहे. महापालिका प्रशासन केंद्राच्या मदतीने दररोज 350 टन कचऱ्यापासून 9 मेट्रिक टन हायड्रोजनची निर्मिती (Hydrogen Production Project) करणार आहे. अशा पद्धतीनं कचऱ्यातून हायड्रोजनचा पहिला प्रकल्प पुण्यात साकारण्यात येणार आहे.

महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन करणारा मोठा विभाग आहे. दररोज सुमारे 500 टनापेक्षा जास्त घनकचरा तयार होतो. या कचऱ्याचे वर्गीकरण रोज होत असते. मात्र त्यापासून इंधननिर्मिती साठी पैसा उभारायचा कसा हा प्रश्न होता. तो आता सुटला असून केंद्र सरकारच्या मदतीनं हडपसर (Hadapsar) येथे कचऱ्यापासून (Garbage) हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यातील उद्योजकांना आता चीनकडून येणाऱ्या गॅस पुरवठ्याची गरज भासणार नाही. या प्रकल्पाचे 70 टक्के काम पूर्ण झाले असून लोकसहभागातून हा प्रकल्प चालवला जाणार आहे. येत्या दिवाळीपर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे तयार होऊन हायड्रोजन निर्मितीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

दिल्ली (Delhi) मधील एक खासगी कंपनी हा प्रकल्प उभारण्याच काम करत असून, दिवाळीत हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.या प्रोजेक्टमुळे कार्बन उत्सर्जन देखील कमी होण्यास हातभार लागणार असल्यान हा पायलट प्रोजेक्ट म्हणून यशस्वी झाला तर राज्यात सर्वत्र अशाच प्रकारचे हायड्रोजन प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

अखेर! आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा 15 जूनला निश्चित

Posted by - June 6, 2022 0
आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीस आदित्य ठाकरेंचा दौरा १० जून रोजी निश्चित…
CM EKNATH SHINDE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘अक्षय तृतीया’ ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा

Posted by - April 22, 2023 0
मुंबई: साडेतीन मुहूर्तांपैकी एक ‘अक्षय तृतीया’ अणि पवित्र अशा रमजान अर्थात ‘ईद-उल-फित्र’ या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा…
Anil Gote

Anil Gote : शरद पवारांना मोठा धक्का ! प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे राष्ट्रवादीतून बाहेर

Posted by - August 9, 2023 0
धुळे : पक्षीय गटबाजीच्या राजकारणासाठी आपण अपात्र (Anil Gote) आहोत. यामुळे अशा गटबाजीला कंटाळूनच राष्ट्रवादीतून स्वखुशीने (Anil Gote) बाहेर पडलो,…
Prakash Javdekar

2024 ला भाजपाला तब्बल ‘इतक्या’ जागा मिळणार; माजी केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान

Posted by - June 2, 2023 0
पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) स्पष्ट बहुमत मिळवत सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार असून नरेंद्र मोदी…

Big News : INFOSYS चे अध्यक्ष मोहित जोशी यांचा राजीनामा

Posted by - March 11, 2023 0
पुणे : इन्फोसिसचे अध्यक्ष मोहित जोशी यांनी राजीनामा दिला आहे. 20 डिसेंबर 2023 पासून टेक महिंद्रा कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *