तो रुग्ण मला घरी नेऊन सोडा म्हणत होता’; बेवारस रुग्णाला निर्जनस्थळी नेऊन टाकल्या प्रकरणी ससूनचे डिन काय म्हणाले, वाचा सविस्तर

232 0

माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुण्यातील ससून रुग्णालयात घडली. बेवारस रुग्णाला एका डॉक्टर आणि त्याच्या साथीदाराने निर्जन स्थळी नेऊन सोडले. यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना बोलावून या रुग्णाला पुन्हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान या सगळ्या घटनेचा घटनास्थळावरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर पुन्हा एकदा ससून प्रशासनावर सर्व स्तरातून टीका होत आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित डॉक्टरचे निलंबन सुद्धा करण्यात आले आहे. या सगळ्यावर ससूनचे अधिष्ठाता एकनाथ पवार यांनी स्पष्टीकरण देताना हा रुग्ण स्वतः ‘मला घरी नेऊन सोडा’ असे म्हणत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

एकनाथ पवार म्हणाले, ’16 जून रोजी अपघात झालेला हा 32 वर्षीय रुग्ण ससून रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या दोन्ही पायांवरून बस गेली होती. ससून मध्ये त्याच्यावर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. प्लास्टिक सर्जरी देखील केली. गेल्या काही दिवसांपासून रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. तेव्हापासून हा रुग्ण मला माझ्या घरी नेऊन सोडा असं डॉक्टरांना म्हणत होता. या सगळ्या प्रकरणांमध्ये ऑर्थोपेडिक्स विभागातील निवासी डॉक्टर डॉ. आदिनाथ यांनी या रुग्णाला नेऊन सोडल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आदिनाथ यांचं निलंबन करण्यात आलं आहे. या प्रकरणाची सखोल सविस्तर चौकशी करण्यात येईल. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.’

 

अधिष्ठाता एकनाथ पवार यांना बेवारस रुग्ण गायब होत असल्याची कल्पना नाही. मात्र या प्रकरणांमध्ये सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणी संबंधित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोण कोण दोषी आढळते, या आधीही ससून मध्ये असे प्रकार घडले आहेत का ? या सगळ्याची चौकशी आणि तपास होणे गरजेचे झाले आहे.

Share This News

Related Post

पुणे जिल्ह्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत १९ ते २१ जुलै दरम्यान जनसुनावणी

Posted by - July 18, 2022 0
पुणे : राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात १९ ते २१ जुलै दरम्यान जनसुनावणी आयोजित…

‘शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’वर या’ मुख्यमंत्र्यांचा संभाजीराजेंना निरोप; संभाजीराजे पक्षप्रवेश करणार ?

Posted by - May 22, 2022 0
शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’ वर या’ असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना पाठवला आहे. संभाजीराजे आणि शिवसेना नेत्यांमध्ये…

माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांना उच्च न्यायालयाचा दणका

Posted by - February 3, 2024 0
उषा काकडे यांचे सख्खे भाऊ बांधकाम व्यवसाईक युवराज ढमाले यांना त्यांचे सख्खे मेव्हणे संजय काकडे व बहीण उषा काकडे यांनी…

PUNE CRIME : व्यवसायिकाचे अपहरण, पाच लाखाची मागितली खंडणी, अल्पवयीन आरोपीसह एक साथीदार गजाआड

Posted by - October 24, 2022 0
पुणे : केसनंद येथील अन्नाचा ढाबा येथे शनिवारी रात्री एका व्यवसायिकाचे अपहरण करण्यात आले. शेवरलेट क्रूज कार रिपेरिंग करण्याच्या बहाण्याने…

बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांना मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

Posted by - August 8, 2024 0
मुंबई: बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते ईत्यादींना मदत करणे आणि त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *