Teacher Suicide News

Teacher Suicide News : विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने ZP शाळेच्या शिक्षकाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

779 0

पुणे : विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये शिक्षकांचा वाटा मोठा असतो. एकीकडे दिवसोंदिवस शिक्षकी पेशाला (Teacher Suicide News) काळिमा फासणाऱ्या घटना समोर येत आहेत. मात्र काही ठिकाणी आजही शिक्षक अत्यंत तळमळीने काम करताना दिसत आहेत. आपलं सर्वकाही झोकून देऊन विद्यार्थ्यांसाठी झटणारे शिक्षक (Teacher Suicide News) फार कमी पाहायला मिळत असतात. अशीच एक धक्कादायक घटना दौंड तालुक्यामध्ये घडली आहे. यामध्ये विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने एका शिक्षकाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.

त्या शिक्षकाची 2 महिन्यांपूर्वीच झालेली बदली
ही धक्कादायक घटना दौंड तालुक्यामधील जावजीबुवाचीवाडी येथे घडली आहे. जावजीबुवाचीवाडी येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक अरविंद देवकरांनी विद्यार्थ्यांनी शाळा सोडून जाणं इतकं मानावर घेतलं त्यांनी थेट स्वतःच आयुष्यचं संपवलं. सर्वच्या सर्व विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने अरविंद यांनी तणनाशक पिऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे अगदी 2 महिन्यांपूर्वीच अरविंद यांची या शाळेत बदली झाली होती.

काय घडले नेमके?
गावातील छोट्याश्या शाळेची दुरावस्था पाहून अरविंद यांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेत त्यांच्या मदतीने शाळा स्वच्छ करुन घेतली. श्रमदान आणि इतर गोष्टींचंही महत्त्व या माध्यमातून मुलांना पटवून देण्याचा अऱविंद यांचा हेतू होता. मात्र अरविंद यांचा हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या पालकांना आवडला नाही. यानंतर पालकांनी शाळेत येऊन गोंधळ घातला आणि मुलांना दुसऱ्या शाळेमध्ये हलवलं. शाळेतील सर्व 10 विद्यार्था शाळा सोडून गेल्याने अरविंद देवकर यांचं मानसिक खच्चिकरण झाले. आणि त्यांनी याच तणावातून आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
अरविंद यांनी आत्महत्येपूर्वी एक चिट्ठीदेखील लिहिली आहे. पूर्वीच्या कार्यकाळामध्ये आपल्याला चांगले सहकारी लाभले होते असा उल्लेख या चिठ्ठीत आहे. आत्महत्येपूर्वी अरविंद यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये संपूर्ण घटनाक्रमाचा उल्लेख त्यांनी सविस्तरपणे केला आहे. आपली नियुक्ती मे महिन्यामध्ये झाली होती. त्यानंतर नेमकं काय काय घडलं आणि शाळेतील विद्यार्थ्यांकडून आपण काम करुन घेतल्याने पालक नाराज झाले यासंदर्भातील तपशीलही अरविंद यांनी या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे. अरविंद यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनादेखील मोठा धक्का बसला आहे.

Share This News

Related Post

Junnar News

Junnar News : बैलगाडा शर्यतीदरम्यान गेला तोल; मात्र पठ्ठयाने प्रसंगावधान राखत पूर्ण केली शर्यत

Posted by - May 4, 2024 0
जुन्नर : बैलगाडा शर्यतीचा थरार पुण्यातील जुन्नर (Junnar News) येथे पाहायला मिळाला. या शर्यतीदरम्यान एक थरारक घटना समोर आली. यामध्ये…

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची ही घ्या यादी

Posted by - June 21, 2022 0
मुंबई- राज्यसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर विधान परिषदेतील विजयानंतर सावरलेल्या शिवसेनेला पुन्हा धक्का बसला आहे. शिवसेनेमधील क्रमांक दोनचे नेते, नगरविकास मंत्री…
Ipc Crpc Amendment Bill

Ipc Crpc Amendment Bill : देशाच्या नव्या कायद्यात होणार ‘हे’ 20 मोठे बदल

Posted by - August 12, 2023 0
मुंबई : देशातील सर्वात महत्त्वाच्या तीन फौजदारी कायद्यांच्या जागी आता तीन नवे कायदे (IPC CRPCc Amendment Bill) येणार आहेत. यासंदर्भात…

Breaking News ! चीनमध्ये आढळला पहिला मानवी बर्ड फ्ल्यूचा रुग्ण, चार वर्षाच्या मुलाला लागण

Posted by - April 27, 2022 0
बीजिंग- चीनमधील हेनान प्रांतात बर्ड फ्लूच्या H3N8 स्ट्रेनचा पहिला मानवी संसर्ग नोंदवला आहे. प्रथमच मानवामध्ये हा संसर्ग आढळून आल्यामुळे भीतीचे…

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला दुखापत; नागपूरमध्ये प्राथमिक उपचार, स्वतः माहिती देताना म्हणाले कि, …

Posted by - December 26, 2022 0
नागपूर : माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना आज मॉर्निंग वॉकला गेले असताना दुखापत झाली आहे. थोरात यांच्या खांद्याला दुखापत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *