sushma andhare and neelam gorhe

Sushma Andhare : ‘तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल पण माफी मागणार नाही’, सुषमा अंधारेनी नीलम गोऱ्हेंना लिहिले पत्र

364 0

पुणे : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यावर आता सुषमा अंधारेनी थेट नीलम गोऱ्हेंना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. मी माफी अजिबात मागणार नाही. यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरी माझी तयारी आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

उपसभापती नीलम गोऱ्हे रविंद्र धंगेकरांना सभागृहात बोलू देत नाहीत अशा आशयाचा व्हिडीओ सुषमा अंधारेंनी प्रसिद्ध केला होता. मुळात धंगेकर या सभागृहाचे सदस्य नाहीत त्यामुळे तात्काळ सुषमा अंधारे यांच्यवर हक्कभंग आणावा, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली होती. त्यानंतर अंधारेंना आठ दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितलं होतं. तसंच दिलगिरीचं पत्र न आल्यास प्रवीण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईन, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या.

सुषमा अंधारेंनी पत्रामध्ये काय म्हंटले?
प्रिय लोकशाही
तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई आहे. स्वातंत्र्यासाठी ज्या अगणित स्वातंत्र्यवीर आणि वीरांगणांनी प्राणांची आहुती दिली तितकीच कटीबद्धता स्वातंत्र्योत्तर काळात ही संविधानिक लोकशाहीची व्यवस्था टिकवण्यासाठीची आता आमची आहे याचे मला भान आहे.

व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संविधानिक मूल्यांचा मी कायमच आदर करत आहे आणि इथून पुढेही तो केला जाईल. त्याचाच भाग म्हणून संविधानाने निर्माण केलेल्या कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे ही माझी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून पहिली जबाबदारी आहे असे मी मानते. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सभापती पद घटनात्मक असल्याने या पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. पण आज विधिमंडळाच्या सभापती पदावरील ‘व्यक्तीने’ माझ्यावर घटनात्मक पदाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे.

माझ्या ज्या कृतीला ते अपराध या व्याख्येत बसवू इच्छितात मुळात ती अत्यंत नकळतपणे अनाहूत झालेली चूक आहे. ज्या अनाहूतपणे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय लोकसेवा आयोग ऐवजी निवडणूक आयोगाकडे विचारणा करू म्हणाले, किंवा देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांचा उल्लेख अनाहूतपणे त्यांनी पंतप्रधान असा केला अगदी तितक्याच अनाहूत, नकळतपणे माझ्याकडून श्रीमती गोऱ्हे यांचे नाव आले. ही चूक नक्कीच आहे. पण हा दंडनीय अपराध नव्हे. पण तरीही माझ्या कृतीला अपराध ठरवण्याची अहममिका सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांकडून सुरू आहे.

सभागृहाची सभापती पदाची गौरव गरिमा वगैरे शब्द उच्चारले जात आहेत पण जर खरेच अशी गरिमा सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांना किंवा सभापती पदावरील व्यक्तीला कळत असेल तर मग या सभापती पदाचे किंवा या सभागृहाचे अस्तित्व ज्या संविधानामुळे आहे. त्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा या राज्याची राष्ट्राची आधारशीला ठेवणारे छ. शिवाजी महाराज, म. गांधी , महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांचा अपमान जेव्हा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे किंवा सरकार दरबार मध्ये मंत्री असणारे श्री चंद्रकांत जी पाटील करत होते तेव्हा याच सभागृहाच्या सभापती पदावरील जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावर हक्कभंग का आणला नाही. किंवा महापुरुषांचा अपमान होतोय म्हणून आ .प्रवीण दरेकर किंवा सुधीर मुनगुंटीवार यांनी ठामपणे तात्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या संदर्भाने निंदाव्यंजक ठराव सभागृहात का मांडला नाही.

सभापती पदावरील व्यक्तीने आठ दिवसाच्या आत ताबडतोब माफी मागा अशी भूमिका श्री चंद्रकांत पाटील किंवा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांच्याबाबत का घेतली नाही? असा सवाल सुषमा अंधारेंनी आपल्या पत्रामध्ये उपस्थित केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Coronavirus : देशात कोरोनाचा धोखा वाढला ! देशभरात 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण

Suryakumar Yadav : टीम इंडियाला T -20 वर्ल्डकपपूर्वी मोठा धक्का ! सूर्यकुमारच्या दुखापतीबाबत ‘ही’ मोठी अपडेट आली समोर

Attempted Self-Immolation : मॉर्डन महाविद्यालयातील दिव्यांग शिक्षकानं उच्च तंत्रशिक्षण विभागात केला आत्मदहनाचा प्रयत्न

Health Tips : हिवाळ्यात दररोज दही खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य?

Bajarang Punia : साक्षी मलिकच्या निवृत्तीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने घेतला पद्मश्री परत करण्याचा निर्णय

Mumbai News : तळीरामांसाठी मोठी बातमी ! मुंबईत हॉटेल, बार आणि वाईन शॉपी पहाटेपर्यंत सुरू राहणार, राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

Eknath Shinde : शिवसेनेचा वर अन् ठाकरे गटाची वधू; ठाण्यातील ‘त्या’ विवाहाची सर्वत्र चर्चा

Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला

Belgaon News : दारुड्या शब्दावर बंदी आण्यासाठी मद्यपींनी काढला थेट विधान भवनावर मोर्चा

Pune Murder : पुणे हादरलं ! संशयातून मित्रानेच केली मित्राची हत्या

Sunil Kedar : रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी; 21 वर्षांनी लागला निकाल

Share This News

Related Post

Covid Scam Case

Covid Scam Case : संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक; EDची मोठी कारवाई

Posted by - July 20, 2023 0
मुंबई : कोविड घोटाळा प्रकरणी (Covid Scam Case) सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी ईडीने संजय राऊत…

परळीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली… पाहा VIDEO

Posted by - August 13, 2022 0
परळी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये…

जुन्नरमध्ये व्यावसायिकाची हत्या ! मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकून दिला

Posted by - April 8, 2023 0
व्यावसायिक वर्चस्वाचा वाद आणि बदनामी केल्याचा राग मनात धरून एका व्यावसायिकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यात उघडकीस आली…

वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई ; राज्य सरकारने लागू केला मेस्मा कायदा

Posted by - March 27, 2022 0
राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंते,तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी व कामगार यांनी आज रविवारी रात्री १२ वाजल्यापासून दोन दिवसीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *