‘टिंगरेचे उपोषण म्हणजे एक नौटंकी’ आमदार सुनील टिंगरे यांच्या आंदोलनावर भाजपची प्रतिक्रिया

603 0

आपल्या मतदारसंघावर प्रशासनाकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी खिल्ली उडवली असून ‘टिंगरेचे उपोषण म्हणजे एक नौटंकी’ असल्याची टीका केली आहे.

पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध मूलभूत प्रश्नांसाठी आमदार सुनील टिंगरे यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे आमदार सुनील टिंगरे सध्या चर्चेत आले आहेत.

पोरवाल रोड वाहतूक कोंडी, एअरफोर्स जागेतील ते धानोरी रोड, नदीकाठचा प्रलंबित रस्ता, विश्रांतवाडी चौकातील बुद्धविहार स्थलांतरित करणे, नगर रोड वाहतूक कोंडी, लोहगावचा पाणी प्रश्न, खंडोबा माळरोड व इतर डीपी रोड, सिद्धार्थनगर झोपडपट्टी पुनवर्सन, धानोरी लक्ष्मी टाऊनशीप ते लक्ष्मी स्मशानभूमी रोड, धानोरी पेलेडीयम रोडच्या रस्त्याची दुरुस्ती अशी विविध विकासकामं करण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी उपोषण सुरु केले आहे.

त्यांच्या उपोषणावर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जोरदार टीका केली आहे. टिंगरेचे उपोषण म्हणजे एक नौटंकी असून त्यांचं ते अपयश आहे. सुनील टिंगरे यांना साडेतीन वर्षे एकही मोठे विकासकाम केले नाही. त्यामुळे सुनील टिंगरे यांची निष्क्रिय आमदार म्हणून ओळख आहे अशी टीकाही मुळीक यांनी केली आहे.

Share This News

Related Post

अभिमानास्पद! ऑस्करमध्ये भारताचा डंका; ‘या’ श्रेणीत पटकावला पुरस्कार

Posted by - March 13, 2023 0
लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळापार पडला. ऑस्कर हा कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. यंदाच्या अकादमी…
Pune Accident News

Pune Accident News : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुण्यतील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - November 20, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune Accident News) मावळ मधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मावळमधील चांदखेड येथे ओढ्यामध्ये कारवरील नियंत्रण…

पुणे : विमाननगर परिसरात झाडपडीच्या घटनेत चारचाकी वाहनाचे नुकसान

Posted by - August 5, 2022 0
पुणे : अनेक दिवस पावसानं दडी मारल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे . अनेक ठिकाणी…
Suicide

धक्कादायक ! जळगावमध्ये महिलेची पाच महिन्यांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Posted by - May 30, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने तिच्या पाच महिन्यांच्या चिमुकल्यासह शेतातील विहिरीत उडी…

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १ डिसेंबरपासून ‘रस्ता सुरक्षा उपक्रम’

Posted by - November 30, 2022 0
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती नवीन व जुन्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे, वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी १ डिसेंबर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *