Sunil Mane

Sunil Mane : ‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजना करा; सुनील माने यांचे जिल्हाधिकाऱ्याना निवेदन

397 0

पुणे : केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्वसामान्य लोकांसाठी पाच लाखांचा आरोग्यविमा देऊ केला आहे. मात्र पुणे शहर आणि जिल्ह्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे निवेदन ज्येष्ठ पत्रकार तसेच कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना दिले.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी आयुष्यमान भारत ही योजना सुरु केली आहे. मात्र या योजने अंतर्गत नेमके कोणत्या आजारांवर उपचार केले जातात याबाबतच्या माहिती अभावी नागरिक आणि रुग्णालयांमध्ये संभ्रम आहे. त्याचप्रमाणे योजनेत अंतर्भूत असणाऱ्या रूग्णालयामध्ये ही हे कार्ड चालत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. अनेक रूग्णालये या योजनेअंतर्गत उपचार नाकारत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे वृत्तपत्रांमधूनही या योजने बद्दल निगेटिव्ह बातम्या छापून येत आहेत.

याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपण रुग्णालय आणि शासन यांच्यामधील दुवा म्हणून काम करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी रुग्णालयांची संख्या ही वाढवणे आवश्यक आहे. याचे समन्वय करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यात या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपण या संबंधित घटकांसोबत स्वतंत्र बैठकीचे आयोजन करावे अशी विनंती त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

KBC 15 : एक चुक पडली 97 लाखांना! विराटचा ‘विराट’ विक्रम थोडक्यात हुकला

Accident News : दुभाजकाला धडकून कारचा भीषण अपघात

Milk : दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरात भीषण अपघात

Share This News

Related Post

Narendra Modi

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे सेवा पंधरवडा – धीरज घाटे

Posted by - September 15, 2023 0
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात सेवा…

MIT World Peace University : हवामानातील बदलांच्या परिणामांबद्दल लोकअदालतला चांगला प्रतिसाद

Posted by - October 4, 2022 0
पुणे : हवामानातील बदलांमुळे येणारे पूर व दुष्काळ या समस्येवर उपाय सुचवणे व त्याची कार्यवाही करणे या हेतूने ‘तेर पॉलिसी…

अपहरण झाल्याचे भासवून एक लाख रुपयांसाठी आईनेच पोटच्या मुलाला विकले (व्हिडिओ)

Posted by - February 8, 2022 0
पुणे- अपहरण झाल्याचे भासवून पोटच्या मुलाला आईनेच एक लाख रुपयांसाठी विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात ही…
Pune News

Pune News : श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ कडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Posted by - January 22, 2024 0
पुणे : अयोध्येतील गायक हेमंत ब्रिजवासी यांची भक्तिपूर्ण रामगीते, मनोहारी नृत्यातून उलगणारे रामायणातील प्रसंग, कर्णमधुर शंखनाद, गंगा घाटावरील महाआरती, या…
Pune Police

Pune Police : शरद मोहोळ केस प्रकरणात पुणे शहर पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

Posted by - February 13, 2024 0
पुणे : पुणे शहर पोलीस (Pune Police) दलातील 5 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कर्तव्यात कसुरी ठेवल्याचा ठपका ठेवत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *