पुण्याच्या सुधीर ठाकूर यांना ऑस्ट्रेलियाचा ‘सिटिझन ऑफ द इयर’ बहुमान

241 0

पुणे- ऑस्ट्रेलियात निराधारांना डबे पोहोचविणाऱ्या संस्थेचे काम करणारे ‘जस्टीस ऑफ पीस’ जबाबदारी सांभाळणारे आणि स्थलांतरितांना इंग्रजी भाषेचे शिक्षण देणारे सुधीर ठाकूर यांना या वर्षीचा ऑस्ट्रेलियाचा ‘सिटिझन ऑफ द इयर’ बहुमान मिळाला आहे. हा समारंभ 26 जानेवारी या ऑस्ट्रेलियन दिनाच्या दिवशी साजरा केला जातो.

सुधीर ठाकूर यांनी मुंबईत हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला आणि ते 1989 मध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. ऑस्ट्रेलियात गेल्यावर उदरनिर्वाहासाठी त्यांनी कामगार म्हणून एका कारखान्यात काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांंना त्यांच्या क्षेत्रात (हॉटेल मॅनेजमेंट) क्वाँटास एअरलाईन्समध्ये फ्लाईट केटरिंग मध्ये नोकरी मिळाली. त्यांनी तेथे सुमारे 20 वर्षे काम केल्यानंतर ते निवृत्त झाले.

निवृत्तीनंतर ते ‘मिल्स ऑन व्हिल्स’ या संस्थेत विनावेतन सेवाकार्य करू लागले. ही संस्था 64 वर्षे जुनी असून ज्येष्ठ नागरिक व निराधार लोकांना स्वस्त दरात जेवण घरपोच पुरवले जाते. ही संस्था दरवर्षी 20 लाख जेवणाचे डबे तयार करते. तेथे सुधीर यांनी डिलिव्हरी ड्रायव्हर, किचनचा इन्चार्ज अशी कामे केल्यानंतर ते संस्थेचे व्हाईस चेअरमन झाले. या संस्थेमध्ये सुधीर यांनी 2 वर्षे काम केले.

सुधीर ठाकूर त्यानंतर ‘जस्टीस ऑफ पीस’ म्हणून नियुक्त झाले. गेली दोन वर्षे ह्या महासाथीच्या काळात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
त्यानंतर मध्ये टीएएफइ (टेक्निकल)मध्ये प्रशिक्षण घेऊन ते व्हॉलेंटियर ट्युटर झाले. इंग्रजीची पार्श्‍वभूमी नसलेल्यांना तसेच नैसर्गिक स्थलांतरितांना फंक्शनल (व्यावहारिक) आणि व्होकशनल (नोकरी आणि व्यावसायिक शिक्षण) इंग्रजी भाषा लिहिण्यास, बोलण्यास आणि वाचण्यास ते शिकवतात. हेच ह्या संस्थेचे प्रामुख्याने आणि मुळ उद्दिष्ट आहे.
या अथक, अविरत आणि विनामूल्य कार्यासाठी ह्यावर्षी सुधीर ठाकूर यांची ‘सिटिझन ऑफ द इयर 2022’ म्हणून निवड झाली.

सुधीर ठाकूर यांचा जन्म 1950मध्ये महाराष्ट्रात झाला गजानन वस्तुभांडारचे मालक नाना ठाकूर हे त्यांचे वडील आणि जयहिंद प्रकाशनचे संस्थापक असलेले ग.का. रायकर हे त्यांचे श्‍वशुर होत. हेमंत रायकर यांनी सुधीर ठाकूर यांचे अभिनंदन केले .

Share This News

Related Post

Sienna Weir

‘मिस युनिव्हर्स’ सिएनाचे अपघात निधन; वयाच्या 23 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Posted by - May 6, 2023 0
मुंबई : ‘मिस युनिव्हर्स 2022’मध्ये (Miss Universe 2022) आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवणारी मॉडेल सीएना वीरचे (Sienna Weir) वयाच्या 23 व्या…
Pune News

यंदा विजयस्तंभ अभिवादन शौर्य दिन सोहळा 2 दिवस साजरा होणार

Posted by - November 8, 2023 0
पुणे : 1 जानेवारी रोजी आंबेडकरी अनुयायांकडून भिमा कोरेगांव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळा दरवर्षी मोठया प्रमाणात साजरा केला जातो.…
Pune News

Pune News : पुण्यात एक पणती पुण्येश्वरासाठी दिपोत्सवाचे आयोजन

Posted by - November 14, 2023 0
पुणे : पतित पावन संघटना आणि शनिवार वाडा चौक मित्र मंडळ आयोजित एक पणती पुण्येश्वरासाठी हा दिपोत्सव भाजपाचे माजी राष्ट्रीय…

पुण्यात शिवसैनिकांकडून तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड

Posted by - June 25, 2022 0
पुणे – एकनाथ शिंदे यांच्या एबन्दानंतर शिवसेना आक्रमक झाली असून अनेक शिवसैनिकांकडून आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केली जात आहे. पुण्यात देखील…

शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहूल पोकळे राष्ट्रवादीत; अजित पवारांच्या उपस्थितीत केला प्रवेश

Posted by - August 6, 2022 0
पुणे: शेतकरी कामगार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष राहूल पोकळे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *