पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू

335 0

पुणे:दीपावलीनिमित्त गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

पुण्यातून दानापूरला जाणाऱ्या रेल्वे मध्ये चढताना प्रवाशांच्या चेंगरा चेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सायंकाळी नऊच्या सुमारास घडली. दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. गाडी फलाटावर आल्यावर प्रचंड गर्दी होती. डब्यात चढताना एकजण खाली पडला गर्दी त्याला तुडवत पुढे गेल्याने त्या प्रवाशाचा जागेवरच मृत्यू झाला.

दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पुण्यातून बाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. अशा स्थितीत गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री पुणे दानापूर एक्सप्रेसला प्रचंड गर्दी झाली होती. याच गर्दीतून गाडीमध्ये चढत असताना प्रवासी खाली पडला आणि इतर प्रवाशांच्या चेंगराचेंगरीत तो गंभीर जखमी झाला, त्याला रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवानांनी तात्काळ उपचारासाठी लोहमार्ग पोलिसांकडे सोपविला. मात्र यावेळी त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले

Share This News

Related Post

पिंपरी चिंचवड परिसरातील रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करा – पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

Posted by - October 21, 2022 0
पुणे : पावसामुळे शहरातील रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे तसेच नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करावीत. रस्ते, आरोग्य, पाणी तसेच…

माझा राजकीय दौरा नाही फक्त शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला मी आलोय- अमित ठाकरे

Posted by - March 21, 2022 0
राज्यभरात उत्साहात आणि मोठ्या धुमधडाक्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी करा असं आवाहन मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानुसार आज…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात, आमदार जगताप सुखरूप

Posted by - May 17, 2022 0
अहमदनगर – नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आज पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. जगताप…

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे डॉ. राजेंद्र सिंह, जी. रघुमान व डॉ.अशोक गाडगीळ यांना  भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Posted by - February 3, 2024 0
पुणे, दि.३ फेब्रुवारी: “ सृष्टीच्या कल्याणासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी यांना निसर्गाप्रती संवेदनक्षम होण्याची गरज आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू…

आगामी 25  वर्षातील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणारा अर्थसंकल्प -चंद्रकांत पाटील

Posted by - February 1, 2022 0
पुणे- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन देशाला आत्मनिर्भर आणि संपन्न बनविण्यासाठीचा ऐतिहासिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *