Jagdish Mulik

सिद्धार्थ नगर येथील झोपडपट्टी धारकांना मिळणार मोफत घर

3944 0

पुणे, 7 : डिसेंबर रस्ता रुंदीकरणामुळे विस्थापित झालेल्या सिद्धार्थ नगर येथील झोपडपट्टीधारकांना मोफत घर देण्याचे आदेश राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे कार्यासन अधिकारी प्रवीण तळेकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन मंडळाच्या पुणे विभागाला दिले असल्याची माहिती माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दिली.

मुळीक म्हणाले, विमान नगर परिसरातील सिद्धार्थ नगर येथे सन 2009 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने अतिमहत्त्वाचा रस्ता निर्माण करण्यात आला. यावेळी 169 रहिवाशांच्या झोपड्या हटवण्यात आल्या. त्यांची रवानगी ट्रानझिट कॅम्प मध्ये तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली होती. परंतु गेल्या 14 वर्षात त्यांना हक्काचे घर मिळाले नव्हते. त्यासाठी मी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी निर्णय घेऊन सहकार्य केले.

Share This News

Related Post

निर्माता बोनी कपूर यांची ३९ लाखांची चांदीची भांडी जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई

Posted by - April 8, 2023 0
बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांना निवडक आयोगाने धक्का दिला आहे. बोनी कपूर यांची तब्बल ६६ किलो चांदीची भांडी…

MPSC EXAM 2021 RESULT : MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर ; पुणे केंद्रातून 903 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र

Posted by - August 27, 2022 0
Mpsc मुख्य परीक्षेच्या निकालासंदर्भात महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 चा…

सवलतीत कर भरण्यासाठी पुणे महापालिकेकडून 3 दिवसांची मुदतवाढ

Posted by - June 1, 2022 0
पुणे – सवलतीच्या दरात मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेकडून ३१ मे ची मुदत देण्यात आली होती. मात्र मुदत संपण्याच्या दोन ते तीन…

अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा कोल्हापूर पोलिसांनी घेतला ताबा

Posted by - April 20, 2022 0
मुंबई – मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केल्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा कोल्हापूर पोलिसांना ताबा मिळालेला आहे.…
Sangli

रुग्णालयात दाखल पत्नीला पाहून घरी परतत असताना पतीचा अपघातात मृत्यू

Posted by - June 3, 2023 0
सांगली : सांगलीमध्ये (Sangli) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये रुग्णालयातील पत्नीला पाहून घरी परतत असताना पतीचा वाटेतच मृत्यू झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *