Manjushri Oak

कौतुकास्पद ! पुण्याच्या मंजुश्री ओकची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद; काय आहे रेकॉर्ड ?

544 0

पुणे : गायिका मंजुश्री ओक (Manjushree Oak) यांनी देशातील विविधतेतील एकात्मतेचे दर्शन घडविण्यासाठी भारतातील 121 भाषा, बोलीभाषा आणि उपभाषांमध्ये सलग साडेतेरा तास गाण्यांचे सादरीकरण करून जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ओक यांनी सादर केलेल्या ‘अमृतवाणी – अनेकता मैं एकता’ या कार्यक्रमाची ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये (Yashwantrao Chavan Theatre) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

गायिका मंजुश्री ओक यांनी यापूर्वी 2017 आणि 2018 अशी सलग दोन वर्षे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ (India Book of Records) व ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये (Asia Book of Records) प्रत्येकी दोन विक्रम नोंदविले आहेत. या विक्रमाबद्दल विचारले असता ‘लहानपणापासून अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना संगीत क्षेत्रातील प्रयत्नांद्वारे देशासाठी काही तरी योगदान द्यावे, हा विचार मनात होता. याच दृष्टीने प्रयत्न करीत असताना ‘श्री यशलक्ष्मी आर्ट’तर्फे आणि पद्मनाभ ठकार यांच्या सहकार्याने ‘अमृतवाणी – अनेकता मैं एकता’ हा कार्यक्रम केला,’ असे ओक यांनी सांगितले.

तसेच गाण्यांमध्ये पारंपरिक गीते, लोकगीते, भक्तिगीते, भावगीते, अभंग, देशभक्तिपर गीते; तसेच लावणीला सामावून घेतले. देशातील ही विविधता भाषा आणि गाण्यांच्या स्वरूपात जगापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने मी हा विक्रम करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला,’ अशी भावना ओक यांनी यावेळी व्यक्त केली.

Share This News

Related Post

Pankaja-Munde

Pankaja Munde : पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ? मोठी अपडेट आली समोर

Posted by - July 6, 2023 0
बीड : राज्यात शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडल्याने राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या 9…

‘निवडणुकीसाठी बायको पाहिजे’ अशी बॅनरबाजी करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा

Posted by - January 31, 2022 0
औरंगाबाद- निवडणुकीसाठी बायको पाहिजे, अशी बॅनरबाजी करून औरंगाबाद शहरात खळबळ उडवणाऱ्या एका राजकीय कार्यकर्त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
ED

पिंपरी चिंचवड : सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ED चे छापे ; 400 कोटींहून अधिकचा घोटाळा

Posted by - January 27, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ईडीने आज सकाळपासून छापे टाकले…

3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

Posted by - December 8, 2022 0
मुंबई : तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी…

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात जल्लोषात श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा

Posted by - January 23, 2024 0
पुणे:  हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरा’त श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा जल्लोषात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *