श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे गणेश जयंती उत्साहात

466 0

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे गणेश जयंती उत्साहात

पुणे :

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात गणेश जयंतीनिमित्त मंगळवारी भजन सेवा, महाआरती आणि जंगी पालखी सोहळ्याचा उत्साह पहायला मिळाला. त्यासोबतच विविध धार्मिक कार्यक्रमही यावेळी उत्साहात पार पडले.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे दरवर्षी गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास भजनी मंडळाकडून भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर स. ९ च्या सुमारास ‘गणेश याग’ करण्यात आला.
‘गणेश याग’ संपन्न झाल्यावर दु. १२ च्या सुमारास ले. जनरल. डी. बी. शेकटकर यांच्या हस्ते बाप्पाची महाआरती करण्यात आली. यावेळी बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भजन सेवा कार्यक्रमाला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत ही भजन सेवा संपन्न झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास बी.व्ही.आय. पुणे यांच्यातर्फे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट परिसरात अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास श्रींचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ट्रस्टचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर गिरनार शक्तीपिठाचे पिठाधीश प.पू. महंत महेशगिरी बापू महाराज यांच्या हस्ते महाआरती झाली. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन उपस्थित होते.

दरम्यान, दिवसभर पुणे व परिसरातील असंख्य भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतले. रात्री ९ नंतर ‘शंकर महाराज भजनी मंडळ’ यांच्यावतीने भजन कार्यक्रम संपन्न झाला.

Share This News

Related Post

Mumbai Pune Highway

Pune-Mumbai Expressway : सोमवारी पुणे-मुंबई द्रुतगतीवर अवजड वाहतुकीला बंदी

Posted by - May 19, 2024 0
पुणे : मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणेकडून…
Pune News

Pune News : रक्तबंबाळ होईपर्यंत शेतकऱ्याला मारहाण; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तुफान राडा

Posted by - June 22, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात (Pune News) तुफान हाणामारी झाली…
Pune Crime News

Pune Crime News : खळबळजनक ! फक्त एक किस दे… पुण्यात वरिष्ठ व्यवस्थापकाची महिला अधिकाऱ्याकडे अजब मागणी

Posted by - December 18, 2023 0
पुणे : पुणे (Pune Crime News) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुण्यातील महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी महिलेचा…

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे तर्फे 16 ते 18 जून दरम्यान मुंबईत राष्ट्रीय आमदारांच्या परिषदेचे आयोजन

Posted by - November 9, 2022 0
पुणे : संविधान समजून घेऊन राज्य आणि देशाच्या विकासाची कामे करणे, नवीन आमदारांना विकास कल्पना प्रणालीच्या विभागाविषयी संवेदनशील करणे तसेच …

चतु:शृंगी देवी मंदिराच्या जीर्णोद्धार प्रकल्पाचे शनिवारी भूमिपूजन

Posted by - April 12, 2022 0
पुणे- चतु:शृंगी देवी मंदिराचा जीर्णोद्धार आणि परिसराचा कायापालट या प्रकल्पाचे भूमिपूजन जगद्गुरू शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी (करवीर पीठ) यांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *