Bhau Rangari Ganpati

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा हेरीटेज वॉकमध्ये समावेश; पुणे महापालिकेची घोषणा

863 0

पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati) पुणे महापालिकेकडून ‘ऐतिहासिक वारसा स्थळ’ म्हणून घोषणा करण्यात आली आहे. याचबरोबर महापालिकेच्या हेरीटेज वॉकमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati) समावेश करण्यात आला आहे. ब्रिटीश राजवटीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि त्यासाठी सर्व जाती धर्मांना एकत्र आणण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मांडली होती. त्यानुसार पुण्यात 1892 मध्ये रंगारी यांनी तीन गणपती बसवले. त्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा समावेश होता.

Ganpati

पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन हे या गणपती ट्रस्टचे विद्यमान उत्सव प्रमुख आणि विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे उत्सवप्रमुख पदाची जबाबदारी आल्यापासून दरवर्षी ट्रस्टच्या माध्यमातून गणेशोत्सवात विविध उपक्रम राबविले जात आहेत. देश-विदेशातून रंगारी गणपतीच्या दर्शनासाठी येतात. मात्र, असे असतानाही महापालिकेच्या ऐतिहासिक वारसा स्थळाच्या यादीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा समावेश नव्हता. पुनीत बालन यांनी त्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर आता रंगारी गणपतीची ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील प्रसिध्द ऐतिहासिक वास्तुंची पर्यटकांना पाहणीसाठी करता यावी यासाठी महापालिकेने जो ‘हॅरिटेज वॉक’ केला आहे, त्यामध्येही रंगारी गणपतीचा समावेश करण्यात आला आहे. या हेरीटेज वॉकमध्ये मध्य पुण्यातील बारा ऐतिहासिक वास्तुंचा समावेश आहे.

रंगारी भवन पर्यटकांचे आकर्षण केंद्र
क्रांतिकारकांचे माहेरघर असलेल्या रंगारी भवनात (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati) गुप्तदालन, भुयारी रस्ते, ब्रिटिशकालीन ऐतिहासिक शास्त्रास्त्रे, इस्ट इंडिया कंपनीची पेटी व वाड्याला सेंट्रल लॉकिंग सिस्टीम असून विश्वस्त पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पुनीत बालन यांनी ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या माध्यमातून रंगारी भवनाचे नूतनीकरण केले. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या पर्यटकांचे हे भवन आकर्षण केंद्र बनले आहे.

Share This News

Related Post

सभा भव्य दिव्य होणार, पोलीस केसेस अंगावर घेण्यास आम्ही तयार- अमित ठाकरे

Posted by - April 30, 2022 0
औरंगाबाद- मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून…
Gadchiroli News

Gadchiroli News : धक्कादायक! धावत्या एसटीने घेतला अचानक पेट

Posted by - March 1, 2024 0
गडचिरोली : गडचिरोलीमधून (Gadchiroli News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील घोट-मुलचेरा महामार्गांवर एका धावत्या बसने अचानक पेट…

“कुठे हरवलास रे पाखरा परत ये आमच्या लेकरा” ; आमदार विजय रहांगडालेंची मुलगा अविष्कारसाठी भावनिक पोस्ट (व्हिडिओ)

Posted by - January 30, 2022 0
तिकोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार याचा मंगळवारी अपघातात मृत्यू झाला. मुलाच्या आठवणीत भाऊक होऊन…

नवनीत राणा व रवी रणा यांच्यावर गुन्हा दाखल करा ; काँग्रेसच्या संगिता तिवारी यांची मागणी

Posted by - April 24, 2022 0
राज्यात सध्या हनुमान चालीसावरून राजकारण तापले असताना मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणारच असा आक्रमक पवित्रा घेणाऱ्या राणा दाम्पत्याला काल खार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *