Dagdusheth Ganpati

Dagdusheth Ganapati : पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेत मोठा बदल

1087 0

पुणे : पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असलेला दगडूशेठ गणपती (Dagdusheth Ganapati) बाप्पा हे विसर्जन मिरवणुकीत रात्री सहभागी होतात. पण, यंदा परंपरेप्रमाणे विसर्जन मिरवणुकीत रात्री सहभागी न होता, दगडूशेठ गणपती दुपारी चार वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहे, असे मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आले आहे.

का बदलण्यात आली वेळ?
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक गेली काही दशके रात्री निघते. लक्ष्मी रस्त्यावर पोलिस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर दगडूशेठ गणपती या मिरवणुकीत सहभागी होत आले आहेत. परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला आहे. मागीलवर्षी सकाळी 7.45 वाजता बेलबाग चौकात बाप्पांचे आगमन झाले.भाविकांना बाप्पांच्या दर्शनासाठी खूप ताटकळत रहावे लागले. म्हणून भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी दुपारी ४ च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल, असे ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी जाहीर केले.

मिरवणुकीला होणाऱ्या विलंबामुळे बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला न होता, पितृ पंधरवडा सुरू झाल्यावर होते. ही गोष्ट गेल्या वर्षी प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे, असं हेमंत रासने यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच चार वाजता बेलबाग चौकातून मार्ग द्यावा. मानाचे गणपती, त्यानंतर महापालिका सेवक मंडळ आणि त्वष्टा कासार मंडळाचा गणपती मार्गस्थ होतो. त्यानंतर दगडूशेठ गणपतीला स्थान द्यावे, अशी मागणी ट्रस्टकडून यावेळी करण्यात आली.

Share This News

Related Post

दाक्षिणात्य ट्रान्सवुमन मॉडेलने लाइव्ह चॅटदरम्यान पंख्याला गळफास लावून केली आत्महत्या

Posted by - May 18, 2022 0
एर्नाकुलम- केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची भागात राहणारी २६ वर्षीय ट्रान्सवुमन मॉडेल शेरीन सेलीन मॅथ्यू हिने आत्महत्या केली. लाइव्ह चॅटदरम्यान पंख्याला…

नवनीत राणा व रवी रणा यांच्यावर गुन्हा दाखल करा ; काँग्रेसच्या संगिता तिवारी यांची मागणी

Posted by - April 24, 2022 0
राज्यात सध्या हनुमान चालीसावरून राजकारण तापले असताना मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणारच असा आक्रमक पवित्रा घेणाऱ्या राणा दाम्पत्याला काल खार…

राणा दाम्पत्याच्या घराबाहेर गोंधळ; 6 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

Posted by - April 24, 2022 0
सध्या राज्यात हनुमान चालीसा वरून राजकारण तापलं असतानाच मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत…

AMOL MITKARI : “बच्चू कडू यांचा अपघात होता की घातपात याची चौकशी झाली पाहिजे…!”

Posted by - January 12, 2023 0
अमरावती : प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काल सकाळी रस्ते अपघात झाला. त्यांना सध्या नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…

धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला अटक

Posted by - April 21, 2022 0
इंदूर- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा हिला अटक करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *