धक्कादायक : पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; असे काय घडले ? वाचा सविस्तर

3712 0

पुणे : पुण्यातील केशवनगर भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आणि संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. केशवनगर भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघा जणांनी आत्महत्या केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार आर्थिक विवंचनेमुळे या चौघा जणांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या लोकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मुंडवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. थोटे कुटुंब केशवनगर मध्ये राहत होते. काही महिन्यांपूर्वीच हे चौघेजण अमरावतीहून पुण्यामध्ये स्थायिक झाले होते.

यामध्ये दीपक पोटे वय वर्ष 59, इंदू थोटे वय वर्ष 45, ऋषिकेश थोटे वय वर्ष 24 आणि समीक्षा थोटे वय वर्ष 17 असं आत्महत्या केलेल्या या चौघांची नावे आहेत. या परिपूर्ण कुटुंबाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आर्थिक नुकसानीमुळे या चौघांनी ही आत्महत्या केली असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही. चौघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Share This News

Related Post

Pune News

Pune Crime : लहुजी साळवे स्मारकाच्या भूमिपूजनानंतर पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची

Posted by - March 2, 2024 0
पुणे : संगमवाडी येथे महापालिकेच्या (Pune Crime) माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या आद्यक्रांती गुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूमीपूजनाची घोषणा राज्य शासनाकडून…

“मी जर मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल…!” विरोधी पक्ष नेते अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

Posted by - December 27, 2022 0
नागपूर : सध्या नागपूर अधिवेशनामध्ये रोजच वेगवेगळ्या राजकीय विषयांवरून टोलवाटोलवी सुरू आहे. आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधानसभेत…

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीपूर्वी शिवसेना आणि शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर

Posted by - August 3, 2022 0
नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच…
Manoj Jarange Patil

Maratha Reservation : आता फक्त दोन दिवस; आरक्षण मिळालं नाही तर…, जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

Posted by - October 22, 2023 0
जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *