उदय सामंत हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या पुणे शहर प्रमुखासह 6 जणांना अटक

568 0

उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांना अटक केली आहे. तसंच मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांना अटक केली आहे. राजेश पळसकर,चंदन साळुंके,सूरज लोखंडे, रुपेश पवार यांनाही अटक केली असून एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काय घडलं नेमकं? शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत हे पुण्याच्या दौऱ्यावर होते.

नेमकं प्रकरण काय?

मंगळवारी उदय सामंत यांच्या वाहनावर कात्रज परिसरात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या वहानाची मागची काच फुटली. विशेष म्हणजे मंगळवारी शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची देखील कात्रजमध्ये सभा होती. या सभेला शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचे बोलले जात आहे. आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी काल रात्री उशिरा शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Share This News

Related Post

CRIME NEWS : पुण्याच्या दिशेने येणारा लाखो रुपयांचा गुटखा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पकडला

Posted by - December 12, 2022 0
पुणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी राजगड पोलीस चौकीच्या हद्दीतील सुमारे 25 ते 30 लाखांचा गुटखा पकडला…
Pune Mall

Pune Fire : पुण्यात फिनिक्स मॉलला लागली भीषण आग; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Posted by - April 19, 2024 0
पुणे : पुण्यातून आगीची (Pune Fire) आणखी एक घटना समोर आली आहे. पुणे शहराच्या मधोमध असणाऱ्या फिनिक्स मॉलला भीषण आग…
Sudhi

धक्कादायक! प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्याचे कार अपघातात निधन

Posted by - June 5, 2023 0
मुंबई : काल रात्री ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन झाल्याची बातमी ताजी असताना पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक…
Sharad Pawar

Sharad Pawar : ‘…अन् पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात वाचलो’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Posted by - January 20, 2024 0
सोलापूर : सोलापूर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ‘नॅब’चे संस्थापक माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित…

आता फेसबुकचे न्यूज फीड फक्त फीड म्हणून ओळखले जाणार 

Posted by - February 17, 2022 0
मेटाने फेसबुक न्यूज फीडचे नाव बदलले आहे. न्यूज फीडला आता फक्त ‘फीड’ म्हटले जाईल. ब्रँड प्लॅटफॉर्मवर काही महत्त्वाचे बदल करत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *