Pune News

Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

222 0

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत यायला सुरुवात झाली आहे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षातले जेष्ठ नेते आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरणार आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या एकूण पाच सभा होणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची भोसरी विधानसभेत 7 मे रोजी रॅली असणार आहे. शिरुर-हवेली, हडपसर, आंबेगाव-शिरुर, खेड -आळंदी, जुन्नर या विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रत्येकी एक सभा होणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघ, सभांचे नियोजन
शिरूर – हवेली विधानसभा
28 एप्रिल – उरळीकांचन, ता. हवेली
जुन्नर विधानसभा
30 एप्रिल – ओतूर बाजार, ता. जुन्नर
हडपसर विधानसभा
6 मे – कात्रज
भोसरी विधानसभा
7 मे – मा. आदित्य ठाकरे यांची रॅली
आंबेगाव – शिरूर विधानसभा
8 मे – रांजणगाव, ता. शिरूर
खेड – आळंदी विधानसभा
10 मे – चाकण बाजार समिती आवार

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

Posted by - October 19, 2022 0
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर…

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याची अटक बेकायदा

Posted by - February 27, 2023 0
पोलीस अधिका-यांनी वरिष्ठांच्या कायदाबाह्य आदेशांना नाही म्हणायला शिकायला हवं. शक्य नसेल तर किमान तश्या लेखी आदेशांची मागणी करावी. असं महत्त्वपूर्ण…
Vaibhav Shinde

Pune Suicide News : धक्कादायक ! सुसाईड नोट मध्ये भावाकडे शेवटची इच्छा व्यक्त करीत पुण्यात पोलिसाची आत्महत्या

Posted by - July 7, 2023 0
पुणे : पो. अंमलदार श्री. वैभव शिंदे, (रा. लोहगाव,खेसे काॅलनी पुणे) यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरी आत्महत्या (Pune Suicide…
Nilesh Lanke and ajit pawar

Nilesh Lanke : आपल्याला निलेश लंकेंचा बंदोबस्त करायचाय; अजित पवारांनी भरसभेत दिला इशारा

Posted by - May 10, 2024 0
अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित…

उदय सामंत हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या पुणे शहर प्रमुखासह 6 जणांना अटक

Posted by - August 3, 2022 0
उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह 5 जणांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *