Sharad Mohol

Sharad Mohol : ‘दूर तुझसे रहकर मैं क्या करूं…’ शरद मोहोळचं बायकोसाठीचे ‘ते’ स्टेट्स ठरलं अखेरचं

1261 0

पुणे : पुण्यासह राज्याला हादरवून टाकणाऱ्या कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणी आता नवनवीन अपडेट समोर येत आहे. लग्नाच्या वाढदिवशी मोहोळची हत्या झाली होती. लग्नाच्या वाढदिवसाच्या आधी मोहोळ याने व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या बायकोचा फोटो स्टेट्सवर शेअर केला होता. आता त्याचे हे स्टेट्स शेवटचे स्टेट्स ठरले आहे.

काय घडले होते?
कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्हीदेखील समोर आले आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 9 पथकं पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना केली. यादरम्यान पुणे-सातारा रोडवर किकवी-शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयीत स्विफ्ट गाडीचा पाठलाग करण्यात आला. यानंतर पोलिसांनी 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राऊंड आणि दोन चारचाकी गाड्या ताब्यात घेतल्या.शरद मोहोळ हत्या प्रकरणातील 6 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य आरोपीसह 6 आरोपींना 10 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार असून या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 2 वकिलांना मात्र केवळ 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Satara Crime : साताऱ्यातील पोवई नाक्यावर सेंट्रो कार आणि एक्टिवामध्ये भीषण अपघात

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या; CCTV फुटेज आले समोर

Kolhapur News : राजाराम कारखान्याच्या एमडीनंतर आता माजी अध्यक्षांना मारहाण; जमावाकडून गाड्यांची जाळपोळ

Pune News : शरद मोहोळ खून प्रकरणात ‘त्या’ दोन नामांकित वकिलांचा समावेश

Pune Crime : पुण्यात टोळीयुद्धातून आतापर्यंत कोणाकोणाची झाली हत्या?

Sharad Mohol Murder : शरद मोहळची हत्या कशी केली? पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Sharad Mohol : शरद मोहोळची गेम गॅंगमधील ‘त्या’ साथीदाराने केली; कोण आहे ‘तो’ व्यक्ती?

Share This News

Related Post

पिंपरी- चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय

Posted by - February 28, 2022 0
पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे 18 उमेदवार निवडून…

” निकालाकडे पाहताना फारसा उत्साह वाटत नाही, ही साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे… ” अश्विनी जगताप यांची भावनिक प्रतिक्रिया

Posted by - March 2, 2023 0
चिंचवड : आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणी…

मुलीला कुत्रा चावला म्हणून महिलेने कुत्र्याच्या दोन पिल्लाना केलं ठार, पुण्यातील घटना

Posted by - April 12, 2022 0
पुणे- मुलीला कुत्रा चावल्याच्या रागातून एका महिलेने कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना काठीने बदडून ठार मारलं. एवढंच नाहीतर सोसायटीतील एकाही कुत्र्याला…

Dagdusheth Ganapati : ‘दगडूशेठ’ गणपतीची श्री हनुमान रथातून थाटात मिरवणूक; RSS चे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना

Posted by - September 19, 2023 0
पुणे : जय गणेश… गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषासोबतच जय श्रीराम, जय श्रीराम च्या नादघोषात श्री हनुमान रथातून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *