पत्रकार, लेखक आशिष चांदोरकर यांचं निधन

538 0

पुणे: ज्येष्ठ पत्रकार अशिष चांदोरकर यांचं आज सकाळी राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

‘सांजसमाचार’ पासून चांदोरकर यांनी पत्रकारितेली सुरवात केली. त्यानंतर ते ‘केसरी’मध्ये पत्रकारिता केली. तेथून ते हैदराबाद येथे ‘ई टीव्ही’मध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये रुजू झाले. तेथे त्यांनी डेस्क आणि रिपोर्टिंगला काम केले. हा अनुभव घेऊन ते पुण्यात ‘सकाळ’मध्ये आले. ‘सकाळ’च्या ‘साम’चे इनपुट आणि आउटपूट या महत्त्वाच्या डेस्कची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती.

’सामना’च्या मुंबई आवृत्तीही त्यांनी काम केले. पुण्यामध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ते उपसंपादक म्हणून रुजू झाले. ‘सकाळ’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ या दोन्ही दैनिकांमध्ये वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीवरचे लेखन प्रसिद्ध झाले. त्याला खवैयांनी मोठा प्रतिसाद दिला. या दरम्यान उदयास आलेल्या ऑनलाइन मीडियामध्ये त्यांनी स्वतःची ओळख निर्माण झाली.

महाराष्ट्र टाईम्स मध्ये उपसंपादक म्हणून देखील त्यांनी तब्बल 9 वर्ष काम केलं देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीवर मॅन ऑफ मिशन महाराष्ट्र या पुस्तकाचं लेखन देखील त्यांनी केलं होतं.

महाराष्ट्र टाईम्समधून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सर्वज्ञ मीडिया सर्व्हिसेस या स्वतःच्या संस्थेची सुरुवात केली होती. लवंगी मिरची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फुडी आशिष या नावाने त्यांनी खाद्यभ्रमंती वर आधारित एक शो देखील सुरू केला होता.

संध्याकाळी पाच वाजता त्यांच्यावर वैकुंठ अंत्यसंस्कार होणार आहेत.

Share This News

Related Post

’50 खोके घेऊन चोर आले…’ रॅपर राज मुंगासे मीडियासमोर, म्हणाला…

Posted by - April 12, 2023 0
काही दिवसांपूर्वी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे एक रॅपसॉंग खूपच व्हायरल झाले होते. हे रॅपसॉंग तयार करणारा रॅपर राज मुंगासे…

BIG BREAKING : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; ईडब्ल्यूएस आरक्षण वैध

Posted by - November 7, 2022 0
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. 10 टक्के आर्थिक आरक्षण म्हणजे ईडब्ल्यूएस आरक्षण वैध असल्याचा…

‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ : पुनित बालन ग्रुप संघाचा विजयाचा चौकार; ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा पहिला विजय

Posted by - November 30, 2022 0
पुणे : बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने स्पर्धेत…

Pune News : पुणे शहरातील दोन पब बंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश

Posted by - May 21, 2024 0
पुणे : पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलांना दारू पुरविल्याप्रकरणी पुणे शहरातील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) व पंचशील…

पोलीस कोठडीत आरोपीला मारहाण केल्या प्रकरणी पोलीस अंमलदार निलंबित

Posted by - May 13, 2022 0
पुणे- पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला बाहेर काढून त्याला पट्ट्याने बेदम मारहाण केल्या प्रकरणी एका पोलीस अम्मलदाराला निलंबित करण्यात आले आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *