पुण्यात गोवर रुबेला लसीकरणाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात

553 0

पुणे महापालिकेच्या वतीने गोवर आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. लहान मुलांसाठी असलेल्या गोवर रुबेला लसीकरणाची दुसरी फेरी 15 ते 25 जानेवारी या कालावधीत राबवण्यात येणार आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात गोवर स्वेना आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.

त्यानुसार शहरातील 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. पुणे महापालिका प्रशासनाच्या सर्व रुग्णालयात ही लसीकरण मोहीम सुरू केली असल्याच महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे.

महापालिकेच्या सर्व दवाखान्यात 15 ते 25 जानेवारी या कालावधीत संपूर्ण शहरात लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.

ज्या बालकांनी या लसीचा डोस घेतला नाही त्यांच्या पालकांनी नजीकच्या महापालिका दवाखान्यात बाह्य लसीकरण सत्रात जाऊन लस द्यावी असं आवाहन महापालिकेने केलं आहे.

Share This News

Related Post

NIA

गडकरी धमकी प्रकरणाचा तपास करण्यासाठी NIA चे पथक नागपुरात दाखल

Posted by - May 25, 2023 0
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. या धमकी (Threat) प्रकरणी तपास…
Murlidhar Mohol

Pune News : मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार

Posted by - June 11, 2024 0
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि नुकतीच केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला.…

MAHARASHTRA POLITICS : “मनसेचं हेच पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवणार…!”, पक्षाची खिल्ली उडवणाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा

Posted by - December 23, 2022 0
नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपुरात दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या विस्तारासाठी स्थानिक नेत्यांशी करण्यासाठी आज राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत.…

चंद्रग्रहण 2022 : विज्ञान काय सांगते? इतिहास, ज्योतिष वाचा सविस्तर माहिती

Posted by - November 8, 2022 0
जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णतः वैज्ञानिक…

पुणेकरांनो..! ‘या’ भागांमध्ये गुरुवारी होणार नाही पाणीपुरवठा

Posted by - November 21, 2022 0
पुणे : येत्या गुरुवारी पुण्यातील शहरी भागातील सर्व मध्यवर्ती भागातील पेठा,कात्रज परिसर, नगर रस्ता, हडपसर तसेच औंध भागासह कोथरूड परिसरातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *