सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे युवा पुरस्कार जाहीर

440 0

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दरवर्षी विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक कार्य आदी क्षेत्रातील युवा पुरस्कारांचे वितरण केले जाते यंदाच्या वर्षीचे हे पुरस्कार घोषित करण्यात आले आहे. या पुरस्कारांबरोबरच विद्यापीठाकडून विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आला असून यांचे वितरण विद्यापीठाच्या वर्धापनदिनी केला जाणार आहे.

युवा गौरव पुरस्कारांमध्ये क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार टेनिसपटू अंकिता रैना, कला क्षेत्रातील पुरस्कार धृपद धमार गायकीमधील गायक चिंतन मधुकर उपाध्याय, साहित्य क्षेत्रातील पुरस्कार लेखिका मनस्विनी लता रविंद्र यांना आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील पुरस्कार विनायक सुभाष लष्कर यांना जाहीर करण्यात आला आहे. हे सर्व पुरस्कारार्थी विद्यापीठाचे व संलग्न महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.

महाविद्यालयीन स्तरावर देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्रा. शंकर बोरमाने, विजय मेधाने, रघुनाथ टोचे यांना जाहीर झाला आहे. तर उत्कृष्ट महाविद्यालयीन प्राध्यापक डॉ. शशिकांत वागे, डॉ. विनय कुमार, डॉ. संजय औटी, डॉ. तुषार चांदवडकर यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट नवोपक्रमशील शिक्षक म्हणून डॉ. विनय कुलकर्णी, डॉ. विठ्ठल बोरकर, डॉ. आकांक्षा काशीकर यांची निवड झाली आहे. यंदाचा उत्कृष्ट नवोपक्रम पुरस्कार शिल्पा मुजुमदार आणि प्रांजली देशपांडे यांना विभागून देण्यात येणार आहे. डॉ. संगीता ढमढेरे व डॉ. नितीन पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार डॉ. मीनल ओक आणि डॉ. बबन चव्हाण यांना देण्यात आला. उत्कृष्ट क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक पुरस्कार डॉ. मुरलीधर गायकवाड व गौतम जाधव यांना जाहीर झाला आहे.

Share This News

Related Post

Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण आणि निमंत्रण अभियान

Posted by - December 28, 2023 0
पुणे : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी होते आहे. त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्यातर्फे पुणे…
Pune News

Pune News : आईसोबतचा ‘तो’ सेल्फी ठरला अखेरचा; विसर्जन मिरवणुकीदरम्यान 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 29, 2023 0
पुणे : पुण्यासह (Pune News) पिंपरी-चिंचवडमध्ये अनंत चतुर्दशीनिमित्त अनेक ठिकाणी उत्साहाला उधाण आलं होतं. बाप्पाचे वाजत-गाजत गणेश विसर्जन करण्यात येत…

मुंबई पदवीधर निवडणुकीत भाजपाला धक्का; ठाकरेंच्या शिलेदारांनं मारलं मैदान

Posted by - July 1, 2024 0
नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक निवडणुकीमध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटानं यांनी बाजी मारली असून भाजपाला या मतदारसंघात मोठा…

मी ब्राम्हण नसून 96 कुळी मराठा – तृप्ती देसाई यांचा ट्रोलर्सवर पलटवार…

Posted by - May 15, 2022 0
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अभिनेत्री केतकी चितळे हिने वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यांनतर या पोस्ट बाबत आणि केतकी चितळेच्या…

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग जाहीर

Posted by - May 19, 2022 0
पुणे- पुणेमहापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. एकूण 173…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *