Sandeep Khardekar

Sandeep Khardekar : महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती

598 0

पुणे : आगामी काळात महायुतीतील सर्व घटक पक्षांशी योग्य समन्वय राखण्यासाठी भाजपचे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) यांची पुणे शहर महायुतीच्या समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. आज प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, यांच्या हस्ते श्री. खर्डेकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी आ. माधुरी मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे,पुणे शहर प्रभारी अमर साबळे,माजी अध्यक्ष जगदीश मुळीक,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

महायुती चे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष,लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम संघटना, पतीत पावन संघटना यासह विविध समविचारी पक्ष,संघटना, स्वयंसेवी संस्था, यांच्याशी योग्य समन्वय साधून, सर्वांच्या सहकार्याने आगामी लोकसभा,विधानसभा व महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवू असा विश्वास संदीप खर्डेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Share This News

Related Post

Raj Thackeray

MNS : लोकसभेच्या रणधुमाळीतून मनसे गायब? मनसे अचानक बॅक फुटवर का गेली?

Posted by - April 3, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप,…
Sangli Loksabha

Sangli Loksabha : मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मोठा धक्का; ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Posted by - April 26, 2024 0
सांगली : सांगलीच्या राजकीय वर्तुळातुन (Sangli Loksabha) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार…

Maharashtra politics : ‘मित्र’ च्या उपाध्यक्षपदी अजय अशर यांच्या नियुक्तीने नवीन वाद; विरोधकांनी उठवली टिकेची झोड, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - December 3, 2022 0
Maharashtra politics : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक विषयावरून वादंग निर्माण होत आहेत. या ना त्या कारण सातत्याने राजकीय वर्तुळात टीकाटिप्पणी…
Supriya Sule

Supriya Sule : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

Posted by - December 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज दिल्लीत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या…

अहमदनगरमध्येही राज ठाकरेंचे जंगी स्वागत! राज ठाकरे यांनी घेतले शाकाहारी जेवण

Posted by - April 30, 2022 0
अहमदनगर- औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे आज पुण्याहून रवाना झाले. राज ठाकरे यांचे अहमदनगरमध्येही जोरदार स्वागत करण्यात आले. वाटेत पुण्याहून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *