Meeting

Sambhaji Raje Chhatrapati : छत्रपती संभाजीराजे यांची केंद्रीय मागासवर्ग आयोगासोबत बैठक संपन्न

490 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला सोबत घेवून केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेवून सविस्तर चर्चा केली. मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळावे तसेच मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर मागास सिद्ध करण्यासाठी आमच्या विनंती नुसार केंद्रीय मागासवर्ग आयोगाने राज्य मागासवर्ग आयोगाला मार्गदर्शक सूचना द्याव्यात अशी मागणी देखील केली.

1950 पर्यंत मराठा समाजाचा Intermediate Community मध्ये समावेश होता, या मुळे त्या वेळी मराठा समाजाला आरक्षण मिळत होते या मुद्द्याकडे लक्ष वेधत असताना एखाद्या राज्यात अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्यासाठीचे निकष हे 1992 सालचे आहे. 1992 सालचे निकष हे आज लागू होणार नाही त्यामुळे हे निकष सद्य परिस्थिती नुसार बदलण्यात यावे अशी मागणी देखील केली.

तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण दिले जाते. आता तेलंगणा आणि कर्नाटक राज्य सरकारने तेथील मराठा समाजाला केंद्राच्या यादीत स्थान देण्याची मागणी केली असून तेथील मराठा समाजाला केंद्राच्या यादीत देखील स्थान मिळण्याची शक्यता आहे. तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण मिळू शकत असेल तर महाराष्ट्रात का नाही ? असा सवाल देखील संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

तसेच मराठा समाज हा सामाजिक मागास आहे, मात्र मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक प्रतिनिधित्व तपासताना 100% पैकी किती? असा फॉर्म्युला वापरायला हवा होता, मात्र त्या ऐवजी 48% खुल्या प्रवर्गातून मराठा किती? असे निकष लावल्यामुळे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या विषयी आम्ही केंद्रीय मागासवर्ग आयोगाशी चर्चा केली व हा निकष बदलण्यासाठी आपण देखील प्रयत्न करावा अशी मागणी केल्याची माहिती देखील पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी राज्यभर संघर्ष करत असताना त्यांच्या प्रामाणिक संघर्षाला व गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला कायदेशीर बळ मिळावे यासाठी केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे आम्ही कायदेशीर मागण्या केल्या असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती पाहता मराठा आरक्षण या विषयात केंद्र सरकारने देखील लक्ष घालायचे हवे, केंद्रीय आयोगाला देखील घटनात्मक दर्जा असल्यामुळे त्यांनी देखील या विषयी लक्ष घालावे व गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी योग्य पाऊल उचलावे असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.

यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्या समवेत मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंढरे, स्वराज्य सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, अंकुश कदम, माधव देवसरकर, विनोद साबळे, रघुनाथ चित्रे, संजय पवार, गणेश सोनवणे, राहूल शिंदे, महादेव तळेकर, राहूल गावडे, विलास पवार, महेश गवळी यांच्यासह मराठा समाजाचे अभ्यासक व पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! ससून रुग्णालयातील ‘तो’ कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

Jalgaon News : जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली

Karad News : भीषण अपघात ! ऊसाच्या ट्राॅलीखाली 7 दुचाकी चिरडल्या

Nashik News : खळबळजनक ! जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलाचा सौदा; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Pooja Sawant Engaged : अभिनेत्री पूजा सावंतने जोडीदारासोबतचा ‘तो’ फोटो शेअर करत केली मोठी घोषणा

IPL 2024 : रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम राहिली शिल्लक?

IND vs AUS T20 : टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचा ऑस्ट्रेलियाने घेतला धसका? महत्वपूर्ण सामन्यापूर्वी निम्मा संघच बदलला

Share This News

Related Post

वाह रे पठ्या ! पुण्याजवळील या गावात शेतकऱ्यांनी केली गव्हाच्या शेतात अफूची लागवड; पोलिसांकडून 11 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Posted by - March 4, 2023 0
पुणे (होळकरवाडी) : पुण्यापासून काही अंतरावर असणाऱ्या होळकरवाडी या गावांमध्ये दोन शेतकऱ्यांनी चक्क गव्हाच्या शेतात अफूची लागवड केल्याचा प्रकार समोर…
CBI

हनीट्रॅप प्रकरणी मुक्त पत्रकारावर गुन्हा दाखल; CBI ची मोठी कारवाई

Posted by - May 16, 2023 0
पुणे : सीबीआयने (CBI) मुक्त पत्रकार विवेक रघुवंशी (Journalist Vivek Raghuvanshi) यांच्याविरुद्ध हेरगिरी केल्याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल केला आहे. सीबीआयकडून…

मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील गुन्हा रद्द

Posted by - April 1, 2023 0
केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यात आला असून अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकारी…

फुगेवाडी मेट्रो स्थानकावर साजरा होणार यंदाचा योगदिन, मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती

Posted by - June 18, 2022 0
पुणे- आगामी आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशाच्या विविध भागात विशेष योग उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त देशातील विशेष व…
Pune Metro

Pune Metro : लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोच्या वेळेत एकदिवसीय बदल

Posted by - November 9, 2023 0
पुणे : रविवार, दिनांक 12 नोव्हेंबर 2023 रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *