इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या पहारेकऱ्यांच्या सतर्कतेला सलाम सिंहगडावर आत्महत्येसाठी आलेल्या तरुणीला वाचवण्यात यश

16 0

पुणे : सिंहगडावर आत्महत्या करण्याच्या इराद्याने आलेल्या एका तरुणीला ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘पुनीत बालन ग्रुप’कडून नेमण्यात आलेल्या पहारेकऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात यश मिळाले. संबधित तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते पुढील तपास करीत आहेत.

‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘पुनीत बालन ग्रुप’ यांच्या माध्यमातून सिंहगडासह काही महत्वाच्या ठिकाणांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. बुधवारी (दि. ९ ऑक्टोबर) दुपारी हे कर्मचारी सिंहगडावर काम करत असताना एक तरुणी गडावर आली. तिच्या बोलण्यावरून आणि हावभावावरून ती काही तरी गडबडत असल्याचे या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. या कर्मचाऱ्यांनी तरुणीला विचारणा केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे देत ती कल्याण दरवाजाच्या दिशेने निघून गेली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले, त्यांनी तत्काळ गडावरील ‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’ व इतर कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन या तरुणीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. तरुणी एका बुरूज आणि दरीच्या ठिकाणी उभी राहून खूप वेळ मोबाईलवर बोलत रडत उभी होती. कुठल्याही क्षणी ती दरीत उडी मारू शकते अशी परिस्थिती होती, मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावध राखून दिलेल्या माहितीमुळे वन विभाग आणि पोलिस पाटील जागेवर पोहचले. त्यांनी या तरुणीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांकडून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. मात्र, ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ व ‘पुनीत बालन ग्रुप’च्या पहारेकरी कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तरुणीला वाचविता आले. त्यामुळे गडावरील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.

सिंहगडावरील स्वच्छता आणि सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून त्या तरुणीला वाचविले. ज्या उद्देशाने आम्ही ऐतिहासिक ठिकाणी कर्मचारी नेमले आहे, तो उद्देश साध्य होत आहे. कर्मचाऱ्यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. एका तरुणीचे धोक्या आलेले प्राण त्यांनी वाचवल्याने मी या कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक करतो, त्यांच्या सतर्कतेला सलाम करतो आणि त्यांचे आभारही मानतो.’ असं युवा उद्योजक पुनीत बालन म्हटले आहेत.

Share This News

Related Post

Dhananjay Munde

Dhananjay Munde : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

Posted by - December 24, 2023 0
पुणे : राज्‍याचे कृषीमंत्री धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रकृतीच्या तक्रारीमुळे ते रूग्णालयात गेले हाेते. तेथे…
Rape

संतापजनक ! ग्रामपंचायत सदस्याने महिलकडे केली शरीर सुखाची मागणी

Posted by - May 20, 2023 0
पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे शारीरीक सुखाची मागणी (Physical Relation) करुन तिचा…

#NILAM GORHE : प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे

Posted by - March 14, 2023 0
मुंबई : राज्याचे चौथे महिला धोरण २०२३ ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे, महिला व…
Rape

धक्कादायक ! पुण्यात उच्चशिक्षित तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

Posted by - June 16, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 28 वर्षीय उच्च शिक्षित तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *